अमरावतीत पहिले सिंधी महापौर; भाजपचे श्रीचंद तेजवानींना मिळाला मान, तर युवा स्वाभिमान पक्षाचे झाले उपमहापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 15:07 IST2026-02-07T15:06:27+5:302026-02-07T15:07:15+5:30

Amravati : अमरावती महापालिकेत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौरपदी निवडून आलेत.

First Sindhi Mayor in Amravati; BJP's Srichand Tejwani gets the honor, Yuva Swabhiman Party's Deputy Mayor | अमरावतीत पहिले सिंधी महापौर; भाजपचे श्रीचंद तेजवानींना मिळाला मान, तर युवा स्वाभिमान पक्षाचे झाले उपमहापौर

First Sindhi Mayor in Amravati; BJP's Srichand Tejwani gets the honor, Yuva Swabhiman Party's Deputy Mayor

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
अमरावती महापालिकेत शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी महायुतीची सत्ता स्थापन झाली. भाजपचे श्रीचंद तेजवानी महापौर तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौरपदी निवडून आलेत. एकूण ८७ पैकी ५५ मते महापौर, उपमहापौरांना मिळाली असून एमआयएमच्या बडनेरा येथील नगरसेविका मीरा कांबळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केल्यामुळे सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला, हे विशेष.

शुक्रवारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पिठासीनाखाली महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक हात उंचावून घेण्यात आली. अगोदर महापौर त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात महापौर श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर सचिन भेंडे या दोघांनाही ५५ मते मिळाली. तर काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार डॉ. संजय शिरभाते आणि उपमहापौर पदाच्या उमेदवार लुबना तनवीर यांना प्रत्येकी १६ मते प्राप्त झाली. काँग्रेसचे १५ तर उद्धवसेनेचे एक असे एकूण १६ मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळाली.

बसप महापौरपदाचे उमेदवार ईस्माईल लालूवाले आणि उपमहापौरपदाचे उमेदवार सचिन वैद्य यांना ३ मते प्राप्त झाली. तसेच महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएम ११, वंचित बहुजन आघाडी १ आणि उद्धवसेना १ असे एकूण १३ सदस्य तटस्थ राहिले. ही निवडणूक प्रक्रिया ईन कॅमेरा पार पडली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महापौर, उपमहापौरांना मिळालेली मते वाचून दाखवित विजयी उमेदवारांची नावे घोषित केली. त्यानंतर नवनियुक्त महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना आसनस्थ करण्यात आले. यावेळी आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पीठे यांनी महापौर, उपमहापौरांचे स्वागत केले.

असे होते ८७ पक्षीय बलाबल

अमरावती महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ८७ सदस्य निवडून आले होते. यात भाजप २५, काँग्रेस १५, युवा स्वाभिमान पक्ष १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, शिंदेसेना ३, बसप ३, उद्धवसेना २ तर वंचित बहुजन आघाडी १ असे ८७ पक्षीय बलाबल होते.

"मला कोणाचाही पक्षादेश नव्हता. महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार चांगल्या प्रतिमेचे आणि सुरक्षित विचार वाटले म्हणून महायुतीला मतदान केले. कारवाईची भीती नाही. राजनीतीत सारेच चालते. मी स्वतःच निर्णय घेतला."
- मीरा कांबळे, नगरसेविका एमआयएम, बडनेरा प्रभाग क्रमांक २१
 

Web Title : अमरावती को मिला पहला सिंधी महापौर; बीजेपी के तेजवानी निर्वाचित, युवा स्वाभिमान से उपमहापौर

Web Summary : अमरावती में, बीजेपी के श्रीचंद तेजवानी महापौर बने, और युवा स्वाभिमान के सचिन भेंडे उपमहापौर बने। उन्हें 87 में से 55 वोट मिले। एक एमआईएम पार्षद ने आश्चर्यजनक रूप से गठबंधन के लिए मतदान किया। चुनाव में एमआईएम, वीबीए और उद्धव सेना के सदस्य अनुपस्थित रहे।

Web Title : Amravati Gets First Sindhi Mayor; BJP's Tejwani Elected, Deputy From Yuva Swabhiman

Web Summary : In Amravati, BJP's Shrichand Tejwani became mayor, and Sachin Bhende, from Yuva Swabhiman, deputy mayor. They secured 55 votes out of 87. An MIM corporator surprisingly voted for the alliance. The election saw MIM, VBA, and Uddhav Sena members abstain.