The farmer dies after falling on a tree and mourns the victim's family in amravati | झाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पीडित कुटंबावर शोककळा

झाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू, पीडित कुटंबावर शोककळा

धारणी (अमरावती) : येथून चार किमी अंतरावर असलेल्या टिंगऱ्या शिवारात अंगावर मोहाचे झाड पडून एका शेतकºयाचा मृत्यू झाला. शंकरलाल दहिकर (५८, खाºया टेंभरू), असे मृताचे नाव आहे.  त्यांचे टिंगºया शिवारात शेत आहे. त्या शेतामध्ये चना, गहू, तूर, कपाशी या पिकाची लागवड केली होती. पिकाच्या सुरक्षिततेसाठी शंकरलाल दहिकर हे दररोज शेतातच राहत होते.

रविवारी सकाळी ते शेतातील मोहाच्या झाडाखाली काम करीत असताना अचानक ते झाड त्यांच्या अंगावर येऊन कोसळले. त्याखाली ते दबल्याचे थोड्या दूर अंतरावर काम करणाºया पत्नीला ते फसलेल्या अवस्थेत दिसले. तिने आरडाओरड केल्याने शेतकरी धावून आले. नातेवाईक व शेजारच्या शेतकºयांनी त्यांना बाहेर काढले असता, ते जागीच गतप्राण झाल्याचे स्पष्ट झाले. मृताच्या पुतण्याने याबाबत धारणी पोलिसात तक्रार दिली आहे.

Web Title: The farmer dies after falling on a tree and mourns the victim's family in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.