Corona dies SRPF soldier, married 8 months ago in amaravati | कोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

कोरोनाने SRPF जवानाचा मृत्यू, 8 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

धामणगाव रेल्वे : तीन वर्षांपूर्वी एसआरपीएफमध्ये दाखल झालेल्या व आठ महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका २७ वर्षीय जवानाचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुक्यातील निंबोली येथील २७ वर्षीय युवक अमरावती येथील एसआरपीएफमध्ये तीन वर्षांपूर्वी दाखल झाला होता. कुटुंब व मित्राला भेटण्यासाठी हा जवान पोळ्याच्या काळात निंबोली येथे आला होता. त्यानंतर अमरावती येथे पोहोचल्यानंतर त्यांना न्युमोनिया व कोरोनाचे निदान झाले. 

गावी आल्यापासून ते अमरावती कोविड रुग्णालयात दाखल होते. गुरूवारी सकाळी सदर जवानाचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात ७० वर्षीय वडील व ६५ वर्षीय आई तसेच ४५ वर्षीय मोठा भाऊ आहे. निंबोली येथील मृत्यू झालेल्या जवानाचा संपूर्ण परिवार अमरावतीला राहत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली.
 

Web Title: Corona dies SRPF soldier, married 8 months ago in amaravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.