In Chandur Bazaar taluka, a misdemeanor on a young woman | चांदूर बाजार तालुक्यात मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग 

चांदूर बाजार तालुक्यात मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग 

बेलोरा (अमरावती) : चांदूर बाजार तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय मतिमंद तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली. 

पोलीस सूत्रांनुसार, मनीष गजानन साबळे (२३, रा. जसापूर, ता. चांदूर बाजार) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सदर तरुणीच्या अगतिकतेचा फायदा घेऊन रात्री ९ च्या सुमारास तिला एका घराच्या आडोशाला नेले आणि अत्याचार केला. याच सुमारास तिची आई व भावजय तेथे पोहोचले. त्यांना पाहून मनीषने पळ काढला. याबाबत चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्र्रकरणी ठाणेदार उदयसिंह सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली भादंविचे कलम ३७६ व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करून आरोपी मनीष साबळेला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक तेजस्विनी गिरसावळे व हेडकॉन्स्टेबल नांदूरकर करीत आहेत.

Web Title: In Chandur Bazaar taluka, a misdemeanor on a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.