भाजप नगरसेवकांचे पालकमंत्र्यांसोबत बैठक; महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:33 IST2026-01-24T17:32:47+5:302026-01-24T17:33:53+5:30

Amravati : महापालिका निवडणुकीत २५ जागांवर विजय मिळवित भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे.

BJP corporators meet with guardian minister; Mayor, deputy mayor elections on January 30 | भाजप नगरसेवकांचे पालकमंत्र्यांसोबत बैठक; महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीला

BJP corporators meet with guardian minister; Mayor, deputy mayor elections on January 30

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
महापालिका निवडणुकीत २५ जागांवर विजय मिळवित भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारूपास आला आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी संख्याबळ कमी असल्यामुळे समविचारी पक्षाशी युती करून अमरावतीचामहापौर भाजपचाच विराजमान होण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, २४ जानेवारी रोजी नवनिर्वाचित भाजप उमेदवारांशी 'वन टु वन' चर्चा करणार आहेत.

ना. बावनकुळे हे शनिवारी अमरावती जिल्हा दौऱ्यावर असून दुपारी १ वाजता नियोजन भवनात डीपीसी बैठकीत आढावा घेतील. त्यानंतर अमरावती महापालिका निवडणुकीत निकालाच्या अनुषंगाने स्थानिक भाजप नेत्यांशी चर्चा करतील. दरम्यान, नवनिर्वाचित नगरसेवकांसोबत 'वन टू वन' चर्चा करून पुढील वाटचालीबाबत मंथन करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. तसेच भाजपच्या पराभूत उमेदवारांसोबत ना. चंद्रशेखर बावनकुळे हे संवाद साधतील. ना. बावनकुळे यांचा अधिकृत दौरा आला असताना भाजपच्या या पडद्याआड घडामोडींविषयी कुठेही नोंद नाही. दुपारी १ ते ५ वाजता यादरम्यान पालकमंत्री हे अमरावतीत असतील.

महापौरपदासंदर्भात मंथन

अमरावती महापालिकेचे १७ वे महापौर हे सर्वसाधारण प्रवर्गातून असणार आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी काही मोजक्याच भाजप पदाधिकाऱ्यांशी महापौरपदासाठी पात्र उमेदवारांच्या नावाविषयी चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परिणामी पालकमंत्री बावनकुळे यांच्या दौऱ्याकडे महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांच्या नजरा लागल्या आहे.

महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीला

अमरावती महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्याकरिता विशेष सभा आयोजित करण्यात आली असून या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने महापौर, उपमहापौर या पदाच्या निवडणुकीचे कामकाज नियमानुसार करावे, असे विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी पत्राद्वारे शुक्रवारी कळविले आहे.

एक लाख टक्के महापौर भाजपचाच होणार : रवी राणा

अमरावती महापालिकेत महापौर भाजपचाच होणार हे एक लाख टक्के सत्य असल्याचे आमदार रवी राणा हे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले. महापालिकेत महायुती होणार असून यात कोणतेही किंतु परंतु नाही. सत्ता स्थापनेसाठी ४८ एवढे संख्याबळ महायुतीकडे आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलत असेल तर यात काही तथ्य नाही. त्या केवळ वावड्या असल्याचा दावा सुद्धा आ. राणांनी केला. महापौर पदासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्याशी अगोदरच बोलणी झाली आहे. अमरावतीत भाजपचा महापौर होणार त्याकरिता युवा स्वाभिमान पक्ष ताकदीने सोबत राहील, असे, आ. रवी राणा यांनी सांगितले.

अमरावती महापालिकेत सत्ता महायुतीची ?

भाजप, युवा स्वाभिमान, शिंदेसेना, बसप आणि उद्धवसेना असे मिळून ४८ संख्याबळ जुळविण्याची खेळी आहे. सत्ता स्थापनेसाठी ४४ एवढेच संख्याबळ आवश्यक असताना ४ सदस्य अधिकचे हाती ठेवले जाणार आहे. विरोधकांच्या प्रत्येक हालचालींवर भाजपचे लक्ष्य असून काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार), एमआयएमला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली आहे. एकंदरीत अमरावती महापालिकेवर महायुतीचाच महापौर बनेल, असे राजकीय समीकरण जुळविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मित्रपक्षाला 'खुश' करण्यासाठी त्यांचे 'लाड' पुरविले जात आहे.

काँग्रेसचेही प्रयत्न

महापौरपदासंदर्भात काँग्रेसनेही छुप्या पद्धतीने आकड्यांची गोळाबेरीज चालवली आहे. समविचारी पक्षांना सोबत घेत सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी काँग्रेसने खेळी रचली आहे. त्यामुळे काँग्रेसची ही खेळी कितपत यशस्वी होते, ४४ हा आकडाच सांगू शकेल.

Web Title : भाजपा पार्षदों की पालक मंत्री के साथ बैठक; महापौर चुनाव 30 जनवरी को

Web Summary : भाजपा अमरावती में महापौर पद सुरक्षित करने के लिए सहयोगी दलों के साथ रणनीति बना रही है। पालक मंत्री पार्षदों के साथ चर्चा करेंगे। महापौर चुनाव 30 जनवरी को; राजनीतिक गतिविधियां तेज।

Web Title : BJP corporators meet with guardian minister; mayor election on January 30.

Web Summary : BJP aims to secure Amravati's mayor post, strategizing with allies. Guardian minister to hold discussions with corporators. Mayor election scheduled for January 30; political maneuvering intensifies.