Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 12:09 IST2019-10-21T10:27:49+5:302019-10-21T12:09:22+5:30
जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला चढवण्यात आला.

Maharashtra Election 2019; अमरावती जिल्ह्यात उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघातक हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सोमवारी सकाळी शेदूरजना घाट येथे अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची चारचाकी वाहन पेटविली. हल्ल्यात जखमी झालेले देवेंद्र भुयार यांना शेंदूरजना घाट पोलिसांनी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी वाहनाच्या दिशेने फायर करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र भुयार यांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला. ते जखमी झाले. तथापि, गोळीबाराचे कुठलेही पुरावे घटनास्थळी आढळले नसल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शंदूरजना घाट पोलिसांत सुरू आहे.