अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

By Atul.jaiswal | Published: April 26, 2024 12:54 PM2024-04-26T12:54:59+5:302024-04-26T12:57:17+5:30

मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले.

Parimal Asanare reached Akola from Singapore for the Lok Sabha Election 2024 | अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

अरेव्वा! लोकसभा मतदानासाठी परिमल असनारे यांनी सिंगापूरहून थेट गाठले अकोला!

अतुल जयस्वाल, अकोला: मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असतानाही अनेक जण मतदानाच्या दिवशी सुटीचा आनंद उपभोगत मतदानाकडे पाठ करतात. अकोला येथील एका युवकाने मात्र राष्ट्रीय कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत थेट सिंगापूर येथून अकोल्याला येत मतदानाचा हक्क बजावला. येथील युवा मतदार परिमल असनारे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने ते बजावलेच पाहिजे या भावनेतून ते अकोल्यात परत आले.

मतदान आपला महत्त्वाचा अधिकार असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे हा संदेश देत परिमल असनारे यांनी सिंगापूर वरून येत अकोला येथील एनआरटी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी प्रत्येकाने मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी असा संदेश त्यांनी दिला. सिंगापूर वरून येत मतदानाचा हक्क मी बजावला आहे आपणही बजावावा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Parimal Asanare reached Akola from Singapore for the Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.