अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : अकोला पश्चिम डबल हॅटट्रिक की धक्कादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 08:50 IST2019-10-24T08:50:09+5:302019-10-24T08:50:21+5:30
Summary: Akola-west Vidhan Sabha Election Results 2019:

अकोला-पश्चिम निवडणूक निकाल : अकोला पश्चिम डबल हॅटट्रिक की धक्कादायक!
अकोला : अकोला पश्चिम हा गेल्या २५ वर्षापासून भाजपाचा गड आहे. गोवर्धन शर्मा यांच्या रूपाने या गडाला जमिनीवरचा गडकरी लाभला असल्याने भाजपाला येथे पराभूत करणे विरोधकांना शक्य झाले नाही. यावेळी शर्मा हे सहाव्यांदा रिंगणात आहेत. ते विजयी झाले तर डबल हॅटट्रिक करणारे ते पश्चिम विदर्भातील पहिले आमदार ठरतील अन् एक विक्रम त्यांच्या नावावर जमा होईल. या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी, मुस्लीम समाजाचे एकगठ्ठा मतदान यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मतविभाजन झाले असून, काँग्रेसलाही संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेस किंवा वंचित आघाडीने विजय मिळविला तर या विजयाची इतिहास म्हणून नोंद तर होईलच.