अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपच्या संजय धोत्रेंची विजयाकडे आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 14:24 IST2019-05-23T14:24:00+5:302019-05-23T14:24:08+5:30
Akola Lok Sabha Election Results 2019

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: भाजपच्या संजय धोत्रेंची विजयाकडे आगेकूच
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची घोडदौड सुरुच असून, त्यांची विजयाकडे आगेकूच सुरु आहे.
दहाव्या फेरीअखेर त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अकोल्यामध्ये पहिल्या फेरीपासूनच भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. दहाव्या फेरी अखेर त्यांना २ लाख ४००२ मतं मिळाली असून , वंचित बहूजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात १ लाख १६ हजार ८५९ मतं पडली आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना १ लाख ५ हजार १७६
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहूजन आघाडीचे अॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. १९८४ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने १९८९ मध्ये विजय मिळविल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीत काँग्रेसने अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीकेल्यामुळे त्याना यश मिळाले. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच काँर्ग्रेसला व अॅॅड.आंबेडकरांनाही विजय मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात असलेलेच उमेदवार २०१९ मध्ये पुन्हा एकदा समोर आल्याने निकालाची पुनरावृत्ती होते की वंचित किंवा काँग्रेस चमत्कार करते याबद्दल उत्सुकता आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.