काॅंग्रेसचे अभय पाटील यांनी दाखल केली उमेदवारी ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक

By संतोष येलकर | Published: April 3, 2024 05:45 PM2024-04-03T17:45:37+5:302024-04-03T17:46:27+5:30

अकोला लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काॅंग्रेसचे डाॅ.अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

abhay patil of congress filed his candidacy in akola lok sabha constituency election 2024 | काॅंग्रेसचे अभय पाटील यांनी दाखल केली उमेदवारी ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक

काॅंग्रेसचे अभय पाटील यांनी दाखल केली उमेदवारी ! अकोला लोकसभा मतदारसंघाची निवडणूक

संतोष येलकर,अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अकोला मतदारसंघातून महाविकास आघाडीच्यावतीने काॅंग्रेसचे डाॅ.अभय पाटील यांनी बुधवारी (दि.३) जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोला लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काॅंग्रेसचे डाॅ.अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

त्यानुसार डाॅ. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, हेमंत देशमुख, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, ॲड.परवेज डोकाडिया, कपिल रावदेव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

‘ए बी’ फाॅर्मसह सादर केला अर्ज !

काॅंंग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून ‘ए बी’ फाॅर्मसह उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे, असे डाॅ.अभय पाटील यांनी यावेळी सांगितले.

Web Title: abhay patil of congress filed his candidacy in akola lok sabha constituency election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.