घराणेशाही विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार : संजीव भोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:50 AM2019-04-20T11:50:09+5:302019-04-20T11:51:41+5:30

लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून अनामत रक्कम भरून धनदांडगे प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार संजीव भोर यांनी येथे व्यक्त केला़

Surgical Strike Against Domestication: Sanjeev Bhor | घराणेशाही विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार : संजीव भोर

घराणेशाही विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार : संजीव भोर

Next

अहमदनगर : लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून अनामत रक्कम भरून धनदांडगे प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार संजीव भोर यांनी येथे व्यक्त केला़
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ जामखेड शहरातील मतदारांशी भोर यांनी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ सुनील जगताप, उमेश राळेभात, प्रवीण कसाब, नितीन ढाळे, प्रशांत पवार, राहुल देशमुख, आकाश घागरे, गणेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ते म्हणाले, विरोधी दोन्ही उमेदवारांच्या घरात पिढ्यानपिढ्या अनेक पदे आहेत. या पदांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संपत्ती गोळा केली. तरीही त्यांनाच पदे हवी आहेत़ गोरगरीब शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांना त्यांनी कधीही न्याय दिलेला नाही. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नासाठी आपण अनेक मोठमोठी आंदोलने केली़ जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे लोकांनीच उमेदवारी साठीवर्गणी करून अनामत रक्कम भरली़ सामान्य कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतल्याने या निवडणुकीत सर्जिकल स्ट्राइक होईल. राजकारणातला हा बदल दुर्लक्षित करता येणार नाही

Web Title: Surgical Strike Against Domestication: Sanjeev Bhor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.