शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019:19 वी फेरी : सेनेचे लोखंडे यांना 1 लाख 14 हजार मतांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 03:23 PM2019-05-23T15:23:02+5:302019-05-23T15:26:12+5:30

Shirdi Lok Sabha Election 2019

Shirdi Lok Sabha Election 2019 live result & winner: sadashiv lokhande lead by 1 lakh | शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019:19 वी फेरी : सेनेचे लोखंडे यांना 1 लाख 14 हजार मतांची आघाडी

शिर्डी लोकसभा निवडणूक निकाल 2019:19 वी फेरी : सेनेचे लोखंडे यांना 1 लाख 14 हजार मतांची आघाडी

googlenewsNext

शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोेखडे, काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात मुख्य लढत होत आहे. एकोणिसाव्या फेरीअखेर सदाशिव लोखंडे 1 लाख 14 हजार 517 मतांनी आघाडीवर आहेत़ काँग्रेसच्या मतदारसंघावर गेल्या वेळेस शिवसेनेने कब्जा केला होता.
शिवसेना हा गड कायम राखील की काँग्रेसच्या हातातून गेलेला गड परत मिळविले का ? याबाबत उत्सुकता आहे.
शिर्डी मतदारसंघात सुरुवातीपासून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी आघाडी घेतली आहे. एकोणिसाव्या फेरीअखेर सदाशिव लोखंडे यांना 4 लाख 53 हजार 517 मते मिळाली. तर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना 3 लाख 38 हजार 793 मते मिळाली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकूण १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६४.५४ टक्के मतदान झालंय.
गेल्या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना ५ लाख ३२ हजार ५७७ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ३ लाख ३२ हजार ७१२ मतं मिळाली होती.

Web Title: Shirdi Lok Sabha Election 2019 live result & winner: sadashiv lokhande lead by 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.