सरकारने फसवी कर्जमाफी केली : अरुण जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:31 PM2019-04-16T12:31:18+5:302019-04-16T12:33:40+5:30

शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़

Government delinked fraudulent debt: Sharad Pawar | सरकारने फसवी कर्जमाफी केली : अरुण जगताप

सरकारने फसवी कर्जमाफी केली : अरुण जगताप

Next

जामखेड : शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात़ ते कृषिमंत्री असताना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती़ मात्र, आताच्या सरकारने फसवी कर्जमाफी केली़ ज्यांना शेतीचा गंधही कळत नाही ते सरकार सत्तेत बसले आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न काय समजणार, असा प्रश्न आमदार अरुण जगताप यांनी केला़
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि़ १५) विधान परिषदेचे आमदार अरूण जगताप यांनी जामखेड तालुक्यातील डोणगाव, आरणगाव, पाटोदा या ठिकाणी सभा घेतल्या़ त्यानंतर जामखेड येथे शहरातील विविध भागातून रॅली काढण्यात आली़ रॅलीनंतर जामखेड येथील महावीर भवन येथे सभा झाली़ या सभेत जगताप बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रेय वारे, शहाजी राळेभात, डॉ. कैलास हजारे, अमजद पठाण, विजय गोलेकर, सुनील लोंढे, राजेंद्र चोपडा, सुमतिलाल कोठारी, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, उमर कुरेशी, अमोल गिरमे, शेरखान पठाण आदी उपस्थित होते.
उपमहाराष्ट्र केसरी काशिद म्हणाले, शेतकºयांचा छळ करणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे़ अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत हे सरकार घालवले पाहिजे़ जगताप कुटुंबीय सर्वांच्या मदतीला धावणारे आहे़ त्याचा निश्चितच फायदा होईल़ सर्वांनी प्रामाणिकपणे कामाला लागावे, असे आवाहन काशिद यांनी केले.

Web Title: Government delinked fraudulent debt: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.