Dr. Sujay vikhe also became a poet | डॉ.सुजय विखेही झाले कवी
डॉ.सुजय विखेही झाले कवी

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केंद्रिय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या पावलावर ठेवले आहे. डॉ.विखे यांनी शेवगावमधील सभेत कविता सादर करत उपस्थिंताची वाहवा मिळवली.
नुकतीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्यामध्ये आठवले साहेबांनी कविता सादर केली. त्यावेळी प्रतिसाद पाहता मी सुध्दा कविता केली आहे. शेवगाव येथील सभेत त्यांनी कविता सादर केली. यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या.

जर तुम्ही निवडून दिले राष्ट्रवादीचे संग्राम जगताप
तर तुमच्या डोक्याला होईल फार मोठा ताप

कारण त्यांनी नगरमध्ये केले आहेत मोठेमोठे प्रताप
कशाला त्यांना मतदान टाकून स्वत:चा वाढून घेताय व्याप

अरे लेकांनो  त्यांना थोडातरी तरू करू द्या पश्चाताप
डॉ. सुजय विखेला मतदान टाकून या जिल्ह्यातून करून टाकाा राष्ट्रवादीचा सुफडा साफ

 

 


Web Title: Dr. Sujay vikhe also became a poet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.