अन...खासदार दिलीप गांधी भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:44 IST2019-04-12T11:39:26+5:302019-04-12T12:44:14+5:30

भाजपचे खासदार दिलीप गांधी नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी चांगलेच चिडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापुर्वी काही क्षण अगोदर घडला.

... Dilip Gandhi agri | अन...खासदार दिलीप गांधी भडकले

अन...खासदार दिलीप गांधी भडकले

अहमदनगर - भाजपचे खासदार दिलीप गांधी नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी चांगलेच चिडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापुर्वी काही क्षण अगोदर घडला. मात्र, उमेदवार डॉ. सुजय विखेंनी सर तुम्ही बोला अशी विनंती केल्यानंतर गांधी पुन्हा बोलायला लागले. पण, बोलताना त्यांचा कंट दाटला होता. मनस्वी आलेला राग गिळताना दिलीप गांधींच्या डोळे पाणावल्याचे कॅमेऱ्यात टिपले गेले. भावुक झालेल्या दिलीप गांधींची नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा नगरमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.    

खासदार दिलीप गांधी यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबविण्यास सांगितले. यावेळी दिलीप गांधी चांगलेच भडकले. गांधी म्हणाले, दोन मिनिटात, मी 10 मिनिटे बोलतो. नाहीतर मला बोलायचं नाही, असे म्हणत गांधी सभेतून निघून जात होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी सर तुम्ही बोला, म्हणत गांधींना भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर भाषणात दिलीप गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

 

Web Title: ... Dilip Gandhi agri