अहमदनगर शहरातून श्रीपाद छिंदम हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:04 IST2019-04-16T13:02:52+5:302019-04-16T13:04:36+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर शहरातून २६२ जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

अहमदनगर शहरातून श्रीपाद छिंदम हद्दपार
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर शहरातून २६२ जणांना हद्दपारीचे आदेश काढले आहेत. छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम यालाही हद्दपार करण्यात आले आहे. तसेच त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यासह हद्दपार केले आहे. २३ एप्रिलपर्यत २६२ जणांना हद्दपार करण्यात आल्याचे प्रातांधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी सांगितले.
तोफखाना पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, कोतवाली पोलीस ठाणे व नगर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत येणा-या गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारांना हद्दपार करण्यात आले आहे. तर ५२ जणांना शहरात राहण्याची अटींवर मुभा देण्यात आली आहे.