तरुणांची फसवणूक करणा-या सरकारला जागा दाखवा : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:30 IST2019-04-14T13:18:58+5:302019-04-14T13:30:56+5:30

देशातील दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे अश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले़ मात्र गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोक-या तर मिळाल्याच नाहीत.

Show the seats to the deceased youth: Sangram Jagtap | तरुणांची फसवणूक करणा-या सरकारला जागा दाखवा : संग्राम जगताप

तरुणांची फसवणूक करणा-या सरकारला जागा दाखवा : संग्राम जगताप

अहमदनगर : देशातील दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे अश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले़ मात्र गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोक-या तर मिळाल्याच नाहीत. पण ज्यांना नोक-या मिळाल्या, त्यांच्याही नोक-या गेल्या़ त्यांना घरी बसावे लागले़ तरुणांची फसवणूक करणा-या भाजप सरकारला जागा दाखविण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन महाआघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी नगर येथे केले़
महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी शहरासह जिल्ह्यातील युवकांशी शुक्रवारी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी तरुणांनी शहरातच रोजगार मिळावा, अशी आशा व्यक्त केली़ युवकांची मते जाणून घेतल्यानंतर जगताप यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार टीका केली़ ते म्हणाले, भाजप सरकारने सर्वसामन्यांना अनेक स्वप्न दाखविली़ रोजगार, व्यावसायासाठी कर्ज, अशी अनेक आश्वासने सरकारने दाखविली़ परंतु, गेल्या पाच वर्षांत ना नोकरी मिळाली ना व्यावसायासाठी कर्ज, असे सांगत सरकारने युवकांची फसवणूक केली असल्याचे ते म्हणाले़
सरकारच्या फसव्या आणि निष्क्रिय धोरणांमुळे तरुणांवर बेरोजगारीचे मोठे संकट ओढावले आहे़ मोदींनी दिलेले दोन कोटी रोजगाराचे आश्वासन, अच्छे दिनचे दाखविलेले फसवे स्वप्न, या सगळ्यांची तरुण आता उघडपणे थट्टा करू लागले आहेत़ देशात आज डीएड-बीएड, एमबीए, इंजिनिअर, झालेले तरुण बेरोजगार आहेत़ पोलीस भरती तसेच एमपीएससी, यूपीएससीचा तरुण रात्रंदिवस अभ्यास करत आहे़ परंतु, गेल्या पाच वर्षांत सरकारने नोकर भरतीच केली नाही़ त्यामुळे तरुणांना नोकरीची संधी मिळाली नाही़ नोकरीच्या शोधात मोठ्या शहरांत दाखल झालेल्या अनेक तरुणांनी गावकडचा रस्ता धरला़ तरुणांना नोकºया देण्याचे धोरण आघाडीच्या काळात घेतले गेले़ तरुणांना नोकºया मिळाल्या़ परंतु, गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोकºया मिळाल्या नसून सरकारला त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असल्याचे जगताप म्हणाले़

बहुत हुई झुठे वादों की मार....
सरकारने बहुत हुए झुठे वादों की मार, अब नही मोदी सरकार, असे म्हणत जगताप यांनी सरकारच्या धोरणांची पोलखोल केली़ यावेळी तरुणांनी व्यथा मांडल्या. त्यावर तरुणांच्या प्रश्नांवर शासन दरबारी आवाज उठवून तरुणांच्या जीवनात नक्कीच चांगला बदल घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जगताप यावेळी म्हणाले.

Web Title: Show the seats to the deceased youth: Sangram Jagtap