Lok Sabha Election 2019: काहीकेल्या बंड शमेना : अहमदनगरमध्ये खासदार पुत्र सुवेंद्र गांधी यांनी नेला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:11 IST2019-03-30T13:07:06+5:302019-03-30T13:11:55+5:30
भाजपाने खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारले असून आज लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी अर्ज नेला.

Lok Sabha Election 2019: काहीकेल्या बंड शमेना : अहमदनगरमध्ये खासदार पुत्र सुवेंद्र गांधी यांनी नेला अर्ज
अहमदनगर : भाजपाने खासदार दिलीप गांधी यांना तिकिट नाकारल्यानंतर पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंड पुकारले असून आज लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी अर्ज नेला.
काल भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे तर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी अर्ज नेले. काल दुस-या दिवशी एकूण २३ जणांनी ३५ अर्ज नेले. दरम्यान, पहिल्या दिवशी एकूण २१ जणांनी ३९ अर्ज नेले होते. अद्यापपर्यत कोणीच अर्ज दाखल केला नाही.भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड व शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी प्रत्येकी दोन अर्ज नेले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यासाठी अशोक शेडाळे यांनी ३ अर्ज नेले. खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्यासाठी अविनाश साखला यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे.
दोन दिवसांपुर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांची रात्री उशीरा भेट घेतली होती. तर काल डॉ.सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. त्यानंतरही आज सुवेंद्र गांधी यांच्यासाठी अर्ज नेण्यात आला आहे.