Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये 31 जणांचे 38 अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:52 IST2019-04-04T17:51:57+5:302019-04-04T17:52:03+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज सादर केले.

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये 31 जणांचे 38 अर्ज दाखल
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज सादर केले.
आज नामनिर्देशनपत्र दाखल करणारांची नावे - विखे धनश्री सुजय (भारतीय जनता पार्टी), संग्राम अरूणकाका जगताप (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी), धीरज मोतीलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी), वाकळे नामदेव अर्जुन यांनी (2 अर्ज)(बहुजन समाज पार्टी), सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष), शेख रियाजउ्दीन फसलोउदीन दादामिया (अपक्ष), कमल दशरथ सावंत (अपक्ष), रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष),आप्पासाहेब नवनाथ पालवे(अपक्ष),भास्कर फकीरा पाटोळे (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष), सबाजीराव महादु गायकवाड(अपक्ष), रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष), शेख आबीद मोहम्मद हनीफ (अपक्ष), भागवत धोंडीबा गायकवाड (अपक्ष), शेख फारूख इस्माईल (भारतीय प्रजा सुराज्य), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (हिंदु एकता आंदोलन पार्टी), विलास सावजी लाकुडझोडे (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष), शेख जाकीर रतन (भारतीय मायनारिटिज पार्टी), पोपट गंगाधर दरेकर यांनी क्रांतीकारी जयहिंद सेनेकडून यांनी अर्ज दाखल केले आहेत.
आज उमेदवारी अर्ज करण्याच्या दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. सात दिवसांच्या कालावधीत ३१ जणांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर ८ एप्रिलपर्यत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे.