“निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, त्यांना महामंडळांवर संधी देणार”: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 08:35 IST2026-01-06T08:35:16+5:302026-01-06T08:35:16+5:30
महापालिकेत युती झाल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे.

“निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, त्यांना महामंडळांवर संधी देणार”: भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
अहिल्यानगर : महापालिकेत युती झाल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यातील काहींना महापालिकेत वेगळ्या पदांवर संधी दिली जाईल. तसेच काही नेते, पदाधिकाऱ्यांना महामंडळावरदेखील संधी दिली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी छेडले असता चव्हाण म्हणाले, अजित पवार काय म्हणाले, ते तपासा. त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून मी बोललो होतो. महायुतीचा धर्म भाजपनेच पाळावा, असे नाही. त्यांनी तसे बोलू नये, आम्हीही बोलणार नाही, असे सांगून अधिक बोलणे टाळले.