बाहेरून येऊन राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:05 IST2022-08-09T19:04:44+5:302022-08-09T19:05:48+5:30
Rohit Pawar: काही राजकीय नेते बाहेरून कर्जत येथील हल्ला प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत हे तेथील जनतेला ही पटत नाही. कोणीही या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

बाहेरून येऊन राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये - रोहित पवार
- अण्णा नवथर
अहमदनगर - काही राजकीय नेते बाहेरून कर्जत येथील हल्ला प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत हे तेथील जनतेला ही पटत नाही. कोणीही या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथील हल्ल्यात जखमी झालेल्या सनी उर्फ प्रतीक पवार याची अहमदनगर येथील रुग्णालयात येऊन भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
रोहित पवार पुढे म्हणाले की कर्जत येथील प्रकरना बाबत तेथील सर्व नगरसेवक, विविध संघटना यांनी एकत्र बसून चर्चा सुरू केली. मात्र काल दोन मोठे नेते कर्जतमद्ये आले होते. केवळ मोठ्याने बोलून काहीही होत नसतं. पोलीस प्रशासन तपास करत आहेत. ज्याच्यावर अन्याय झाला आहे ,त्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे असेही पवार म्हणाले.