सुजय विखेंच्या 'होम मिनिस्टर' धनश्री यांनी गुपचूप भरला उमेदवारी अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 16:11 IST2019-04-04T16:07:52+5:302019-04-04T16:11:46+5:30

भाजपकडून डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला आहे

Dhanashree Sujay Vikhe filled the application for the last minute | सुजय विखेंच्या 'होम मिनिस्टर' धनश्री यांनी गुपचूप भरला उमेदवारी अर्ज

सुजय विखेंच्या 'होम मिनिस्टर' धनश्री यांनी गुपचूप भरला उमेदवारी अर्ज

अहमदनगर : भाजपकडून डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज तीन वाजेपर्यत अखेरची मुदता होती. धनश्री विखे अत्यंत गुप्त पध्दतीने येत २ वाजून ५५ मिनिटांनी एक अर्ज दाखल केला आहे. त्यांचे पती डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल आहे. आज धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Dhanashree Sujay Vikhe filled the application for the last minute