Lok Sabha Election 2019 : शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज दाखल : पहिल्याच दिवशी नेले ४२ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 17:09 IST2019-04-02T17:08:33+5:302019-04-02T17:09:06+5:30
शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

Lok Sabha Election 2019 : शिर्डी मतदारसंघासाठी काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज दाखल : पहिल्याच दिवशी नेले ४२ अर्ज
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज भाऊसाहेब मल्हारी कांबळे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. शिर्डी मतदारसंघातील आजपासून प्रक्रिया सुरु झाली असून कांबळे यांनी पहिल्याच दिवशी अर्ज भरला. पहिल्या दिवशी २५ जणांनी ४२ अर्ज नेले.
पहिल्या दिवशी अर्ज नेलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात अर्जांची संख्या), शरद बापू गुंजाळ यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी (4),सतिश पंढरीनाथ शिंदे यांनी सदाशिव लोखंडे यांच्यासाठी (3), बाळासाहेब एकनाथ सोनवणे, रा. मुकींदपूर, गाडेनगर, ता. नेवासा यांनी भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांच्यासाठी (4 ), नानासाहेब भानुदास तुपे यांनी अॅड. संतोष कांबळे यांच्यासाठी (4), किशोर दादू वाघमारे यांनी अरुण साबळे यांच्यासाठी (1), बापू पाराजी रणधिर (2), मच्छिंद्र आनंदा नागरे यांनी सुधाकर प्रभाकर रोहम यांच्यासाठी (1), किशोर दादू वाघमारे (1), बहिरीनाथ तुकाराम वाकळे यांनी अॅड. कॉम्रेड बन्सी भाऊराव सातपुते यांच्यासाठी (4), गोरख सिताराम भारुड, रा. निपाणी वडगांव, ता. श्रीरामपूर (2), दिलीप गोपीचंद बडधे बेलापूर खु, ता. श्रीरामपुर यांनी सोपान तुकाराम औचित्य यांच्यासाठी (2), सुनिल विनायक कांबळे, कोल्हार खु, ता. राहुरी (1), शिमोन ठकाजी जगताप, निमगांव को-हाळे, ता. राहाता (1), किरण शेबाजी शेजवळ, भिमनगर, शिर्डी, ता. राहाता (1), माधव सखाराम त्रिभुवन, आंबेडकरनगर, ता . कोपरगांव (1), सुरेश एकनाथ जगधने, श्रीरामपुर (1), गणपत मच्छिंद्र मोरे, खडका, ता. नेवासा (1), दिपक प्रमोद क्षेत्रे, व्दारकाधिश कॉलनी, भिंगार यांनी अशोक रामचंद्र गायकवाड (1), डॉ. पांडूरंग बाबासाहेब बुरुटे, रा. पिंपळे गुरव पुणे (1), रोहम योसेफ आरसुड, नालेगाव (1), डॉ. विजयकुमार पोपटराव पोटे, बुरुडगावरोड, ता.जि.अहमदनगर (1), राहुलभैय्या हरिभक्त, मु.पो. भांबोरा, ता. कर्जत (01), आशिष युवराज बागुल, रा. लक्ष्मीनारायणनगर, गोंदवणी रोड, श्रीरामपूर (01), युवराज धनाजी बागुल, श्रीरामपूर (01), लक्ष्मण काशीनाथ साबळे, कोर्ट रोड, कोपरगाव (01)