पारनेरमध्ये घरातील कर्त्याच्या निधनानंतरही कुटुंबियांनी केलं मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 18:38 IST2019-04-23T18:38:03+5:302019-04-23T18:38:13+5:30
पारनेर तालुक्यातील जवळे येथील योगेश किसन रावळ (वय ३६) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.

पारनेरमध्ये घरातील कर्त्याच्या निधनानंतरही कुटुंबियांनी केलं मतदान
जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील योगेश किसन रावळ (वय ३६) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यानंतरही जवळे यांच्या कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला.
योगेश रावळ यांचे अचानक निधन झाले. त्यानंतर आज सकाळी जवळे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुपारी जवळे येथील मतदान केंद्रावर योगेश रावळ यांची आई सुलोचना किसन रावळ, वडील किसन दशरथ रावळ, पत्नी उर्मिला योगेश रावळ, भाऊ दुर्गश किसन रावळ यांनी मतदान केले.