नगर-दौंड मार्गावर अपघात : एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:01 IST2019-04-20T17:56:23+5:302019-04-20T18:01:58+5:30
मढेवडगांव (ता.श्रीगोंदा) येथे आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नगर-दौंड रोडवर अपघात झाला.

नगर-दौंड मार्गावर अपघात : एक ठार
मढेवडगांव : मढेवडगांव (ता.श्रीगोंदा) येथे आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नगर-दौंड रोडवर अपघात झाला. बसस्थानकाशेजारी गव्हाचे पोते भरलेली मालमोटारीवर पाठीमागून येणारी बटाटा भरलेल्या मालमोटारने जोरदार धडक दिल्याने गाडीचा चक्काचूर झाला. यात गाडीचा क्लीनर रामलखन प्रितमसिंह बघेल(वय -२४ राजस्थान) हा जागीच ठार झाला. तर चालक अमित मिश्रा(वय वर्षे ३२) हा जखमी झाला.
गावक-यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला खबर देऊन माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा केला. अपघातग्रस्त गाडी रस्त्यावरच असल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. पोलिसांनी क्रेन आणून गाडी बाजूला केल्यावर वाहतूक सुरळीत चालू झाली. पुढील तपास पोलीस नाईक विकास वैराळ व पोलीस हवालदार किरण भापकर करत आहेत.