पुणे: राज्यात पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ २२ टक्के शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे.
शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देणे तसेच नुकसानभरपाईच्या निकषांत कपात केल्याने नोंदणीवर परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांची नोंदणी वाढावी यासाठी व ही नोंदणी किमान ६४ लाख व्हावी, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. मात्र, ३१ जुलैपर्यंतची अंतिम मुदत असल्याने येत्या सात दिवसांत ही संख्याही गाठणे अवघड आहे.
यंदा विमा हप्ता आणि नुकसानभरपाई यात बदल झाल्याने शेतकऱ्यांचा सहभाग कमी झाल्याचे निरीक्षण आहे. २०१६ मध्ये पीक कापणी प्रयोगावर नुकसान भरपाई दिली होती.
यंदा शेतकरी संख्या घटण्याची शक्यता
यंदा एक रुपयात विमा हप्ता सवलत बंद करणे, नुकसानभरपाईचे निकष बदलणे, पीक पाहणी आणि अॅग्रीस्टॅकमधील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करणे या कारणांमुळे योजनेतील सहभागी शेतकरी संख्या घटणार हे गृहीत धरण्यात आले आहे.
विभागनिहाय शेतकरी सहभाग (अर्जाची संख्या)
कोकण - ३५,६५९
नाशिक - ३,१४,५९१
पुणे - २,३५,६१९
कोल्हापूर - ६३,३८४
छत्रपती संभाजीनगर - १०,७८,५१५
लातूर - १३,३०,००३
अमरावती - ४,९२,०७६
नागपूर - १,२७,५२६
एकूण - ३६,७७,३६८
केवळ सात दिवसांत २८ लाख शेतकरी वाढणार?
◼️ गेल्या वर्षी राज्यात १ कोटी ६८ लाख ४२ हजार ५४२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता.
◼️ मात्र, आतापर्यंत केवळ २१.८३ टक्के अर्थात ३६ लाख ७७ हजार ३६८ शेतकऱ्यांनी अर्जाची नोंदणी केली आहे. हा सहभाग खूपच कमी आहे.
◼️ लातूर विभागात सर्वाधिक १३ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी तर कोकण विभागात ३५ हजार ६५९ अर्ज शेतकऱ्यांनी दाखल केले आहेत.
◼️ हा सहभाग वाढविण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश कृषी आयुक्तालय पातळीवरून दिले.
◼️ सहभागासाठी आता केवळ सात दिवसांचा अवधी उरल्याने अजून २८ लाख शेतकरी वाढतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अधिक वाचा: Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा