लाइव न्यूज़
 • 12:34 PM

  कर्नाटक: विधानसभा अध्यक्षपदी रमेश कुमार यांची निवड

 • 12:25 PM

  नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंना कोर्टाचे आदेश. दुपारी तीन वाजेपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश. अनधिकृत बांधकामावरील कारवाईवर कोर्टाची कारणे दाखवा नोटीस.

 • 12:10 PM

  इंधन दरवाढीपासून जनतेची लवकरच सुटका होईल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं आश्वासन.

 • 11:46 AM

  कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे यांची नियुक्ती. ताराराणी आघाडीच्या रूपराणी निकम यांचा केला पराभव.

 • 11:35 AM

  रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयात बॉम्बसदृश बॉक्स सापडल्याने खळबळ. यंत्रणेची धावपळ सुरू.

 • 11:19 AM

  बोधगया स्फोट : प्रकरणातील पाचही आरोपींना पाटणा कोर्टाने ठरविलं दोषी. पुढील सुनावणी 31 मे रोजी.

 • 11:11 AM

  औरंगाबाद : वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून शासकीय रुग्णालय घाटीची पाहणी सुरु.

 • 11:06 AM

  उन्नाव बलात्कार प्रकरण- भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर व शशी सिंह या दोघांना कोर्टात केलं हजर. 8 जून रोजी प्रकरणावर होणार पुढील सुनावणी.

 • 10:35 AM

  यवतमाळ : महागाव तालुक्याच्या धनोडा येथील पेट्रोलपंपावर ५५ हजाराची चोरी. चोरट्यांनी कर्मचाऱ्याच्या उशीखालील चावी काढून पळविले पैसे.

 • 10:28 AM

  नागपूर- हॉटेल बैठकीत रात्री अज्ञात 7 ते 8 तरुणांची तोडफोड

 • 10:23 AM

  कॅनडात भारतीय रेस्टॉरन्टमध्ये भीषण स्फोट. 15 जण जखमी झाल्याची माहिती.

 • 10:17 AM

  मुंबई- शिक्षक मतदारसंघ निवडणूक, निवडणुकीला गैरहजर राहिल्यास शिक्षकांवर फौजदारी कारवाई होणार- निवडणूक आयोग

 • 10:15 AM

  नाशिक- मनपातल्या 22 अधिका-यांच्या बदल्या, राजकीय दबाव आणल्यास शिस्तभंग कारवाई होणार- तुकाराम मुंढे

 • 10:04 AM

  यवतमाळ : शहरातील धामणगाव मार्गावरील मटका अड्ड्यावर अमरावती सीआयडी पथकाची धाड, गुरुवारी रात्री 11 वाजता रोख रकमेसह आठ जणांना घेतले ताब्यात.

 • 09:00 AM

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 27 मे रोजी कुरुक्षेत्रच्या दौऱ्यावर.

All post in लाइव न्यूज़