'रात्रीस खेळ चाले २'मध्ये नाईकांच्या वाड्यात येणारी ही व्यक्ती कोण..?, मालिकेत येणार धक्कादायक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 01:19 PM2019-07-09T13:19:27+5:302019-07-09T13:19:47+5:30

'रात्रीस खेळ चाले 2' मालिकेत येणार धक्कादायक वळण

Who is this guy coming to Naik's house in 'Ratris Khel Chaale 2'? Shocking turn in the series | 'रात्रीस खेळ चाले २'मध्ये नाईकांच्या वाड्यात येणारी ही व्यक्ती कोण..?, मालिकेत येणार धक्कादायक वळण

'रात्रीस खेळ चाले २'मध्ये नाईकांच्या वाड्यात येणारी ही व्यक्ती कोण..?, मालिकेत येणार धक्कादायक वळण

googlenewsNext

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. आता या मालिकेत एका पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र नवीन नसून आधीच्या भागातही पहायला मिळालं होतं. 

झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात व्यक्तीचा चेहरा गिफ्ट्सने झाकलेला पहायला मिळतोय. हा फोटो शेअर करून नाईकांच्या वाड्यात येणारी ही व्यक्ती कोण..? असं लिहिलं आहे. 


'रात्रीस खेळ चाले २'चा नुकताच प्रसारीत झालेल्या भागात ही व्यक्ती कोण असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मुंबईतून माधव इतक्या वर्षानंतर घरी येतो आहे. या भागात नाईकांच्या घरात आगमन झालेल्या दत्ताच्या चिमुकल्या पाहुण्याचा बारसा समारंभाची तयारी सुरू आहे. त्यात पोस्टमन पत्र घेऊन येतात आणि माईला वाचून दाखवतात. ते पत्र माधवचे असते आणि त्या पत्रात माधव गावी येत असल्याचं सांगतो. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असतं. 


ज्योतिषी पाटणकर येतात आणि हा मुलगा हुशार असून तो स्वतःचा मार्ग स्वतः काढणार असा सांगतो. तर वच्ची बाळासाठी पांडूकडून गिफ्ट पाठवते. वच्चीला ते बाळ तिचा मुलगा काशी वाटत असतो. वच्ची ते गिफ्ट सरीताकडे द्यायला सांगते. साखळी गिफ्ट म्हणून दिली असते. ती साखळी बाळाला घालायला जाते. तेव्हा बाळ जागेवर नसते. बाळाचं काय होतं हे, आगामी भागात कळेल.  

Web Title: Who is this guy coming to Naik's house in 'Ratris Khel Chaale 2'? Shocking turn in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.