कुल्फीने केली ७२ वर्षांच्या वृद्धेची इच्छा पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:12 PM2018-08-22T13:12:49+5:302018-08-22T13:13:47+5:30

कोणत्याही कलाकाराच्या जीवनात त्याच्या चाहत्यांचे स्थान फार महत्त्वाचे असते आणि काही चाहते हे कलाकारांच्या जीवनावर कायमचा ठसाही उमटवून जातात. अशाच एका एलिझाबेथ नावाच्या वृद्ध महिला चाहतीच्या इच्छेने कुल्फीच्या (आकृती शर्मा) डोळ्यांत अश्रू आणले.

Kulfi kumar bajewala kulfi aka Aakriti Sharma fulfill her fan's wish | कुल्फीने केली ७२ वर्षांच्या वृद्धेची इच्छा पूर्ण

कुल्फीने केली ७२ वर्षांच्या वृद्धेची इच्छा पूर्ण

googlenewsNext

मुंबईत राहणाऱ्या एलिझाबेथ नावाची एक ७२ वर्षांची वृद्ध महिला तीव्र मधुमेहाशी संघर्ष करत असून त्यांच्यावर मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी उपचारही सुरू आहेत. तिची कुल्फी कुमार बाजावाला या मालिकेतील कुल्फीला भेटण्याची तीव्र इच्छा होती.

कोणत्याही कलाकाराच्या जीवनात त्याच्या चाहत्यांचे स्थान फार महत्त्वाचे असते आणि काही चाहते हे कलाकारांच्या जीवनावर कायमचा ठसाही उमटवून जातात. अशाच एका एलिझाबेथ नावाच्या वृद्ध महिला चाहतीच्या इच्छेने कुल्फीच्या (आकृती शर्मा) डोळ्यांत अश्रू आणले. एलिझाबेथ या मुंबईत एकट्याच राहतात. त्यांच्या दोन मुलीही मुंबईतच राहतात, पण त्या आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. पण मधुमेहाशी झगडताना आपल्या या अखेरच्या दिवसांत एलिझाबेथ यांना आपल्या मुलींपेक्षा कुल्फीची भेट घेणे महत्त्वाचे वाटले.

एलिझाबेथ यांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या एका शेजाऱ्याने सांगितले, “गेली अनेक वर्षं एलिझाबेथ या एकट्याच राहतात. त्यांना प्रचंड प्रमाणात मधुमेह असल्याने त्या थोड्या दिवसांच्या सोबती आहेत असे डॉक्टरांनी देखील सांगितले आहे. त्या पूर्णपणे बिछान्याला खिळून असून केवळ औषधांवर जगत आहेत. पण आपल्याला या अवस्थेतून कुल्फीच बाहेर काढू शकेल, असं त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांना कुल्फीची भेट घ्यायची होती. त्या कुल्फीकुमार बाजेवाला ही मालिका नियमितपणे बघतात आणि कुल्फीला त्या आपली स्वत:चीच मुलगी मानतात.”

तिच्या या अवस्थेत त्यांना कुल्फीची भेट घेण्यासाठी जाणं शक्य नव्हतं. तेव्हा तिने त्यांची व्हिडिओवरून भेट घेतली. यासंदर्भात कुल्फी सांगते, “त्यांच्याशी बोलताना मला खूप बरं वाटलं. त्या या आजारातून लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणजे मला त्यांची भेट घेण्यासाठी जाता येईल. माझ्या आईने मला त्यांच्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्यांच्या प्रेमाने माझं मन हेलावलं. त्यांना या आजारातून लवकर बाहेर काढण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना केली.”

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. 

Web Title: Kulfi kumar bajewala kulfi aka Aakriti Sharma fulfill her fan's wish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.