'बिग बॉसचा 13' मध्ये विवेक दहियाच्या एंट्रीवर, पत्नी दिव्यांका त्रिपाठीने दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 11:37 AM2019-06-18T11:37:23+5:302019-06-18T11:37:47+5:30

विवेक दहिया 'कयामत की रात' आणि 'कवच' या मालिकेत झळकला होता.

Divyanka Tripathi Reacts Of Her Husband Vivek Dahiya Participating In Bigg Boss-13 | 'बिग बॉसचा 13' मध्ये विवेक दहियाच्या एंट्रीवर, पत्नी दिव्यांका त्रिपाठीने दिले सडेतोड उत्तर

'बिग बॉसचा 13' मध्ये विवेक दहियाच्या एंट्रीवर, पत्नी दिव्यांका त्रिपाठीने दिले सडेतोड उत्तर

googlenewsNext

'बिग बॉस' आणि 'वाद' हे जणू समीकरणच बनले आहे. गेल्या 12 सीझनपासून सुरु असलेली वादाची परंपरा यंदाही कायम आहे. लवकरच बिग बॉसचा 13 सीझन सुरू होणार आहे. सहभागी होणा-या स्पर्धकांची यादीही लवकरच जाहीर होणार आहे. यात आता टीव्ही अभिनेता विवेक दहियाचे नाव आघाडीवर आहे. विवेक दहिया बिग बॉस 13 मध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.  
मात्र दिव्यांका त्रिपाठीने ही माहिती खोटी असल्याचे सांगितले आहे. मुळात बिग बॉसमध्ये राहण्यासाठी खूप पेशंस लागतात जे विवेकमध्ये नाही. तसेच विवेकचा स्वभावही बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी मिळता जुळता नाही. सहभागी होण्याचा विचार तर सोडाच कल्पना करणेच अशक्य असल्याचे दिव्यांकाने सांगितले.

त्यामुळे मिळालेली माहिती खोटी असल्याचे दिव्यांकाने म्हटले आहे. याविषयी विवेक दहियानेही कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नसून शोच्या कॉन्ट्रॅक्टनुसार जोपर्यंत प्रोडक्शन टीम स्वतः स्पर्धकांची यादी जाहीर करत नाही. तोपर्यंत कोणत्याही स्पर्धकाला ही माहिती गुपित ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार विवेकनेही कदाचित मौन पाळले असावे असेही तर्कवितर्क लावले जात आहे. विवेक दहियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, 'कयामत की रात' आणि 'कवच' या मालिकेत झळकला होता. तसेच तो एक एकता कपूरच्या सुपरनॅचरल शो आगामी  'नागिन  4'मध्ये मुख्य भूमिकेत झळकण्याची शक्यता आहे. 


टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जी 'बिग  बॉस 13' सिझनमध्ये सहभागी होणार असल्याचे समजतंय. विशेष म्हणजे या शोमध्ये सहभागी होण्यासाठी तिने 'कसौटी जिंदगी की  2' मालिका सोडली असल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेऊन यावर्षी येणाºया बिग बॉस 13 मध्ये निर्मात्यांनी एक मोठा बदल केला आहे.


सेलिब्रिटी  आणि कॉमनर्स  यांच्या थीमवर आधारित हा लोकप्रिय शो मागच्या वर्षी दर्शकांचे मनोरंजन करू शकला नाही. यावर्षी या शोमध्ये कॉमनर्सना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यावर्षी बिग बॉस 13 मध्ये फक्त सेलिब्रिटी लोक पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Divyanka Tripathi Reacts Of Her Husband Vivek Dahiya Participating In Bigg Boss-13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.