किशोरी शहाणे यांनी सांगितले त्यांचा मुलगा बॉबीच्या आयुष्यातील एका खास क्षणाविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 06:33 PM2019-07-12T18:33:46+5:302019-07-12T18:34:31+5:30

किशोरी शहाणे वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये त्यांचा मुलगा बॉबी विज बाबत बोलताना दिसत आहेत.

bigg boss marathi 2 contestant kishori shahane talked about her son bobby vij | किशोरी शहाणे यांनी सांगितले त्यांचा मुलगा बॉबीच्या आयुष्यातील एका खास क्षणाविषयी

किशोरी शहाणे यांनी सांगितले त्यांचा मुलगा बॉबीच्या आयुष्यातील एका खास क्षणाविषयी

ठळक मुद्देविजेत्यांची अनाऊन्‍समेंट होत असताना वेगवेगळे लुक ऑफ द इअर सगळ्यांना भेटत होते. पण त्‍याच्‍यात कशातच बॉबीचं नाव नव्‍हतं. पण अखेर जेव्‍हा फर्स्‍ट रनर अप बॉबी विज असे पुकारले गेले तेव्‍हा आम्हाला झालेला आनंद आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. सध्या घरात असलेल्या स्पर्धकांपैकी कोण स्पर्धक विजेता ठरणार याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहेत. या आठवड्यात लावणी समाज्ञी सुरेखा पुणेकर घरातून बाहेर पडल्या. त्या या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवतील असे त्यांच्या चाहत्यांना वाटत होते. पण त्यांची निराशा झाली असेच म्हणावे लागेल.

बिग बॉस मराठी २ मधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येत आहे. अशाच एका गप्पांमध्ये किशोरी शहाणे यांनी त्यांचा मुलगा बॉबीच्या मॉडलिंग करिअरमधील एक खास गोष्ट सांगितली.

किशोरी शहाणे वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये त्यांचा मुलगा बॉबी विज बाबत बोलताना दिसत आहेत. त्या सांगत आहेत की, ''माझा मुलगा बॉबीने मागच्‍या वर्षी एका मॉडलिंगच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने तीन महिने खूप वर्कआऊट करून खूप चांगली बॉडी बनवली होती. पण फायनल्‍सच्‍या दोन ते तीन दिवस आधी त्‍याला टायफाईड डिटेक्‍ट झाला. त्यामुळे डॉक्‍टरांनी त्याला टोटल बेड रेस्‍ट घ्यायला सांगितली होती. तरी तो स्पर्धेच्या तयारीत स्वतःला झोकून देत होता. अखेरीस डॉक्टरांनी सांगितले की, तू झोपलास नाहीस तर तू कुठे तरी पडशील. त्‍याला हे डॉक्टरांनी सांगताच त्याने माझ्याकडे बघितलं, दीपककडे बघितले आणि म्‍हणाला, 'मी कुठेतरी पडेल... पण मला जाऊ दे!’.'' 

त्याच्या या स्पर्धेतील फायनलविषयी किशोरी सांगतात, ''या स्पर्धेची फायनल महालक्ष्‍मी रेसकोर्सला झाली होती. विजेत्यांची अनाऊन्‍समेंट होत असताना वेगवेगळे लुक ऑफ द इअर सगळ्यांना भेटत होते. पण त्‍याच्‍यात कशातच बॉबीचं नाव नव्‍हतं. आम्हाला खूप वाईट वाटत होते. पण अखेर जेव्‍हा फर्स्‍ट रनर अप बॉबी विज असे पुकारले गेले तेव्‍हा आम्हाला झालेला आनंद आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. अक्षरशः माझ्या अंगावर काटे आले होते.'' 

Web Title: bigg boss marathi 2 contestant kishori shahane talked about her son bobby vij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.