बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंच्या पाठीला 'या' महिला सदस्याने केला मसाज, पाहा व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:45 PM2019-06-18T12:45:24+5:302019-06-18T13:07:00+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली म्हाडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले.

Big Boss Marathi 2: Heena panchal give massage to abhijeet bichkule in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंच्या पाठीला 'या' महिला सदस्याने केला मसाज, पाहा व्हिडीओ

बिग बॉस मराठी २ : अभिजीत बिचुकलेंच्या पाठीला 'या' महिला सदस्याने केला मसाज, पाहा व्हिडीओ

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यामध्ये वैशाली माडे घराची नवी कॅप्टन बनली. आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार शेरास सव्वा शेर हे कार्य. ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या स्थानावर उभे राहून चर्चा करायची, त्यानंतर त्यांच्या अंतिम स्थानावर उभे राहून त्यांच्या आधीच्या क्रमांकापेक्षा ते खाली का आहेत तसेच नंतरच्या क्रमांकापेक्षा वरचढ का आहेत याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे.

सर्व सदस्यांनी सांमजस्याने आणि विचारविनिमय करून सर्वानुमते निर्णय घेऊन ही प्रक्रिया पार पाडायची आहे. आता बघूया घरातील सदस्य किती सांमजस्याने आणि विचारपूर्वक ही प्रक्रिया पार पाडतील.

 

ऐवढंच नाही तर बिचुकले यांनी हिनाकडून पाठिला मसाजदेखील करुन घेतलायं. शेरास सव्वा शेर या टास्कमध्ये अभिजीत बिचुकले आणि रुपाली यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. ज्यामध्ये अभिजीत बिचुकले हे चार क्रमांकावर उभे आहेत आणि रुपालीचे असे म्हणणे आहे, त्या क्रमांकावर मला उभे राहायचे आहे कारण, बिचुकले यांनी काहीही काम केलेले नाही, तसेच ते टास्कमध्ये देखील फितूर होते. तसेच रूपालीने बिचुकले यांना सांगितले तुम्ही स्ट्राँग नाहीये, त्यावर बिचुकले देखील म्हणाले तू बोंबलत बसं मी चार क्रमांक सोडणार नाही. रुपालीने केलेल्या एका वक्तव्यावर बिचुकले खूप चिडले आणि ते म्हणाले घरापर्यंत पोहोचू नकोस... असं काय बोली रुपाली कि अभिजीत बिचुकले यांचा पारा चढला ? आणि ते भांडण विकोपाला गेले...

Web Title: Big Boss Marathi 2: Heena panchal give massage to abhijeet bichkule in bigg boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.