मेरे साई या मालिकेत या कलाकाराची होणार एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 05:46 PM2018-07-20T17:46:58+5:302018-07-20T17:47:48+5:30

मेरे साई ही मालिका प्रेक्षकांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून मनोरंजन करत असून आता ही मालिका लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत आता काही नवीन कलाकार दाखल होणार आहेत.

Beyhadh fame rakshit in mere sai | मेरे साई या मालिकेत या कलाकाराची होणार एंट्री

मेरे साई या मालिकेत या कलाकाराची होणार एंट्री

googlenewsNext

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या मालिकेत साईबाबांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ही मालिका आणि विशेषतः या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेत अबीर सुफी साईबाबांची भूमिका साकारत असून प्रेक्षकांना त्याचा अभिनय खूपच आवडत आहे. ही मालिका प्रेक्षकांचे गेल्या कित्येक महिन्यांपासून मनोरंजन करत असून आता ही मालिका लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत अनेक बदल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत आता काही नवीन कलाकार दाखल होणार आहेत. हे नवीन कलाकार देखील प्रेक्षकांना तितकेच आवडतील अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
मेरे साई या मालिकेत आता तात्या मोठा झालेला दाखवणार आहेत. आता तात्याची (बायजाच्या मुलाची) भूमिका रक्षित वाही हा लोकप्रिय बालकलाकार साकारणार आहे. त्याने अलीकडे बेहद या मालिकेत शुभ माथुर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. मेरे साईच्या आगामी कथानकात बायजा आणि तात्या यांच्यातील माय-लेकाचे हळूवार नाते आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई देखील बायजाला ‘माँ’ म्हणत असल्यामुळे साई आणि तात्या यांच्यातील अनोखे नाते प्रेक्षकांना पाहता येईल. या भूमिकेबद्दल रक्षितला विचारले असता ती सांगते, “माझी या भूमिकेसाठी निवड झाली याचा मला अतिशय आनंद होत आहे. साई बाबांच्या कृपेने मला मेरे साई मध्ये तात्याची भूमिका साकारण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. मी जेव्हा बेहद मालिकेत काम करत होतो, तेव्हा माझा लुक माझ्या सध्याच्या लुकपेक्षा वेगळा होता. बेहदचा एक कलाकार या नात्याने टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. मला आशा आहे की, त्यांना माझी मेरे साई मालिकेतील तात्याची भूमिका देखील आवडेल. माझ्या संपूर्ण कुटुंबाची साई बाबांवर प्रचंड श्रद्धा आहे, विशेषतः माझी आई ही त्यांची मोठी भक्त आहे.”

Web Title: Beyhadh fame rakshit in mere sai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.