माढ्यातून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भरला अर्ज

By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 16, 2024 03:10 PM2024-04-16T15:10:03+5:302024-04-16T15:11:50+5:30

Lok Sabha Election 2024: धैर्यशील यांच्याकडून विजयसिंह मोहिते-पाटलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.

Mohite-Patil files his nomination for Madha Lok Sabha Constituency in Solapur, Lok Sabha Election 2024 | माढ्यातून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भरला अर्ज

माढ्यातून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भरला अर्ज

सोलापूरमाढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील हे उपस्थित होते. धैर्यशील यांच्याकडून विजयसिंह मोहिते-पाटलांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे माजी सभापती शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते. माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी अर्ज स्वीकारला आहे.

Web Title: Mohite-Patil files his nomination for Madha Lok Sabha Constituency in Solapur, Lok Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.