सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते अन् माढ्यातून नाईक-निंबाळकर यांनी भरला अर्ज

By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 16, 2024 01:48 PM2024-04-16T13:48:06+5:302024-04-16T13:49:21+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: BJP's Ram Satpute from Solapur and Naik-Nimbalkar from Madhya filed their application | सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते अन् माढ्यातून नाईक-निंबाळकर यांनी भरला अर्ज

सोलापुरातून भाजपकडून राम सातपुते अन् माढ्यातून नाईक-निंबाळकर यांनी भरला अर्ज

- बाळकृष्ण दोड्डी 
सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून राम सातपुते तसेच माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते यांनी देखील सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सातपुते यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील तसेच नाईक-निंबाळकर यांच्यासोबत आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार  शहाजीबापू पाटील तसेच माण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे आदी उपस्थित होते. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात दाखल झाले असून शहरातून रोड शो सुरू आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: BJP's Ram Satpute from Solapur and Naik-Nimbalkar from Madhya filed their application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.