अजित पवारांबाबत हायकोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:14 PM2019-04-01T12:14:41+5:302019-04-01T12:18:45+5:30

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला.

The High Court's decision can be made against Ajit Pawar; Revenue Minister Chandrakant Patil | अजित पवारांबाबत हायकोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 

अजित पवारांबाबत हायकोर्टाचा निर्णय कधीही येऊ शकतो; महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 

googlenewsNext
ठळक मुद्दे- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौºयावर- माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आली गती

सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबतची केस हायकोर्टात चालू आहे. कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय येऊ शकतो, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सोलापुरात दिला. 

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूलमंत्री पाटील म्हणाले, आपला देश घटनेवर चालतो. कायद्याप्रमाणे सर्वांवर कारवाई होईल. भुजबळ दोन वर्षे आत राहिले. अजित पवारांची केस हायकोर्टात चालू आहे. हायकोर्टाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आम्ही दिली आहेत. कोणत्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय येऊ शकतो. त्यामुळे कोणालाही वाचविण्याचा प्रश्न नाही असेही महसूलमंत्र्यांनी सांगितले़ 


 

Web Title: The High Court's decision can be made against Ajit Pawar; Revenue Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.