देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; 'फॅमिली फर्स्ट'मुळे भारताचे नुकसान - योगी आदित्यनाथ

By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 1, 2024 04:34 PM2024-05-01T16:34:35+5:302024-05-01T16:43:28+5:30

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

Congress hinders the development of the country; India's Loss Due to 'Family First' - Yogi Adityanath | देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; 'फॅमिली फर्स्ट'मुळे भारताचे नुकसान - योगी आदित्यनाथ

देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; 'फॅमिली फर्स्ट'मुळे भारताचे नुकसान - योगी आदित्यनाथ

सोलापूर : देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा असून त्यांच्या 'फॅमिली फर्स्ट' या वृत्तीमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे काँग्रेसला दूर करा. 'नेशन फर्स्ट'ला प्राधान्य देणाऱ्या नरेंद मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सोलापूरच्या सभेत केले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगणावर दुपारी साडेतीन वाजता त्यांची सभा झाली.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, ज्योती वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Congress hinders the development of the country; India's Loss Due to 'Family First' - Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.