मोदी-शहांच्या अन्यायाविरोधात पहिला आवाज महाराष्ट्राचा - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:14 PM2019-04-17T21:14:23+5:302019-04-17T21:19:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांच्याविरोधात देशात फारसं कोणी बोलत नसताना मीच कसा काय बोलतोय असं मला विचारलं जातं, ह्याचं उत्तर आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्थान आहेत

First voice against Modi-Shahs from Maharashtra says Raj Thackeray | मोदी-शहांच्या अन्यायाविरोधात पहिला आवाज महाराष्ट्राचा - राज ठाकरे 

मोदी-शहांच्या अन्यायाविरोधात पहिला आवाज महाराष्ट्राचा - राज ठाकरे 

Next

सातारा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांच्याविरोधात देशात फारसं कोणी बोलत नसताना मीच कसा काय बोलतोय असं मला विचारलं जातं, ह्याचं उत्तर आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज माझे प्रेरणास्थान आहेत. कारण मुघलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला आवाज महाराष्ट्र होता, मग मोदी आणि शाह ह्यांच्याविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल? असं सांगत राज ठाकरे यांनी मोदी-शहांची तुलना मुघल ब्रिटिशांची केली. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्याविरोधात प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातारा येथे जाहीर सभा घेतली, त्या सभेत राज यांनी पुन्हा एकदा मोदी-शहांना लक्ष्य केलं. 

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राजा रामदेवराय ह्या आमच्या राजाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता कारण महाराष्ट्र बेसावध राहिला. त्यामुळे तुम्ही बेसावध राहू नका. मोदी आणि शाह तुमचं जगणं हराम करू शकतात अशी मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय असं राज यांनी सांगितले. 

पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ज्या विषयांवर बोलले होते त्या विषयांवर ते आज बोलायला तयार नाहीत. नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातले एकमेव पंतप्रधान जे गेल्या ५ वर्षात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पासून ते मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मोदींनी ह्या देशावर नोटबंदी लादली. असं काय होतं की ह्या सगळ्यांना तुम्हाला विश्वासात घ्यायचं नव्हतं? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. 

तसेच नोटबंदीने ४ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काळा पैसा होता तसाच आहे. फक्त भाजपचं सेव्हन स्टार कार्यालय दिल्लीत उभं राहिलं आणि निवडणुका जिंकायला पैसे आले हेच भाजपासाठी साध्य झालं. भाजपाकडे निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च करतायेत हा पैसा आला कुठून? देशात अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या गेल्या. त्याठिकाणी भाजपाचे कार्यालय उभी केली जातायेत. सगळी यंत्रणा यांच्या हातात आहे. पोलिसांच्यासमोर लोकांना पैसे वाटले जातायेत असा गंभीर आरोप राज यांनी केला. 

Web Title: First voice against Modi-Shahs from Maharashtra says Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.