ठळक मुद्देश्रीमंत व्यक्ती फक्त पुरूषच असू शकतात असा सगळ्यांचा समज असतो. पण जगातील काही महिलांनी आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर हा समज खोटा ठरवला आहे. व्यावसायिक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करून पुरूषांनाही मागे टाकत या महिलांनी सर्वांसमोर स्त्रीशक्तीची ताकद दाखवून दिलेली आहे. 

मुंबई : श्रीमंत व्यक्ती फक्त पुरूषच असू शकतात असा सगळ्यांचा समज असतो. पण जगातील काही महिलांनी आपल्या जिद्दीच्या आणि चिकाटीच्या जोरावर हा समज खोटा ठरवला आहे. व्यावसायिक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करून पुरूषांनाही मागे टाकत या महिलांनी सर्वांसमोर स्त्रीशक्तीची ताकद दाखवून दिलेली आहे. 

१) लिलिएन बेटनकोर्ट 

जगातील सर्वात प्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनांचं  उत्पादन करणाऱ्या लॅारिअल कंपनीच्या मालक असलेल्या लिलिएन यांचं उत्पन्न ४४.३ अब्ज डॅालर इतकं होतं. 

२) एलिस वॅाल्टन 

अमेरिकेतील प्रसिद्ध वॅालमार्ट स्टोअरच्या मालक असलेल्या एलिस यांचं उत्पन्न ३३.८ अब्ज डॅालर इतकं आहे. 

आणखी वाचा - #WomensDay2018 : या आहेत भारतातील १० यशस्वी महिला उद्योजक 

३) जॅकलिन मार्स 

अमेरिकेतील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार म्हणून मार्स यांची ओळख आहे. मार्स यांचं उत्पन्न २७ अब्ज डॅालर इतकं आहे. 

४) मारिया फ्रँका फिसोलो 

मारिया या इटलीमध्ये राहाणारे अब्जाधीश आहेत. युरोपमधीलच नाही तर जगभरातील सर्वात प्रसिद्ध फेरेरो चॅाकलेट्स आणि मिठाई कंपनीच्या त्या मालक आहेत. त्यांचं उत्पन्न २५.२ अब्ज डॅालर आहे.

५) सुसॅन क्लेटन

जर्मनीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सुसॅन यांची ओळख आहे. बीएमडब्लू आणि अल्टाना या नामवंत कंपनीच्या त्या गुंतवणूकदार आहेत. त्यांचं उत्पन्न २०.४ अब्ज डॅालर आहे.

आणखी वाचा - या ‘5’ गोष्टी ठेवतात स्त्रियांना कायम आनंदी आणि समाधानी

६)  लॅारेन पॅावेल जॅाब्स 

सामाजिक संस्थांच्या लॅारेन कार्यकर्त्या आहेत. अॅपल कंपनीचे मालक स्टिव्ह जॅाब्स यांच्या लॅारेन पत्नी आहेत. त्यांच उत्पन्न २० अब्ज डॅालर आहे.

 ७) जिना रिनेहार्ट

 ऑस्ट्रेलियातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असलेल्या जिना हॅंकॅाक या कंपनीच्या मालक आहेत. त्यांचं उत्पन्न १५ अब्ज डॅालर आहे.

८) अॅबगेल जॅान्सन 

अॅबगेल जॅान्सन या अमेरिकेच्या बिझनेस वुमन आहेत. फिडेलिटी या कंपनीच्या त्या मालक असून त्यांच उत्पन्न १४.४ अब्ज डॅालर इतकं आहे.

९) आयरिस फॅान्टबोना 

आयरिस यांचं स्थान जगातील श्रीमंतांच्या यादीत १०१ क्रमांकावर असून लॅटिन अमेरिकेतील श्रीमंतांमध्ये त्या पाचव्या स्थानावर आहेत. त्यांचं उत्पन्न १३.७ अब्ज डॅालर इतकं आहे. 

१०) बिट हेसिटर 

जर्मनीच्या अब्जाधीशांपैकी एक असलेल्या बिट किराणा माल सवलतीत मिळवून देणाऱ्या 'अल्दि' या सुपरमार्केटच्या मालक आहेत. त्यांचे उत्पन्न १३.६ अब्ज डॅालर इतके आहे.

आज महिला दिना निमित्त आपण पाहिल्या जगातील या सक्षम आणि श्रीमंत स्त्रिया. या महिलांना खऱ्या अर्थाने म्हणता येईल 'बाईमाणूस'. भारतात जेव्हा अशी परिस्थिती येईल तेव्हा नक्कीच महिला दिन साजरा करायची आवश्यकता भासणार नाही.

 


Web Title: #WomensDay2018 : 10 richest women in the world with billions property
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.