lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > मैत्रीतले ब्रेकअपही आयुष्यभर छळते, मित्रमैत्रिणींनीच फसवलं तर? आपलं नक्की काय चुकतं?

मैत्रीतले ब्रेकअपही आयुष्यभर छळते, मित्रमैत्रिणींनीच फसवलं तर? आपलं नक्की काय चुकतं?

आपली सच्ची मैत्री आहे की कामापुरती सोय हे ओळखायला शिका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2024 05:26 PM2024-03-15T17:26:36+5:302024-03-15T17:31:04+5:30

आपली सच्ची मैत्री आहे की कामापुरती सोय हे ओळखायला शिका.

A breakup in a friendship torture for the whole life, if the friend cheated? What exactly are you missing? | मैत्रीतले ब्रेकअपही आयुष्यभर छळते, मित्रमैत्रिणींनीच फसवलं तर? आपलं नक्की काय चुकतं?

मैत्रीतले ब्रेकअपही आयुष्यभर छळते, मित्रमैत्रिणींनीच फसवलं तर? आपलं नक्की काय चुकतं?

Highlightsमुळात आपलं जग असं कितीसं मोठं असतं. होतात चुका म्हणून स्वत:ला आणि इतरांनाही माफ करुन टाकायचं.

मला ना खूप मित्रमैत्रिणी आहेत पण कुणाशी मनातलं बोलता येत नाही. बोललं तर आपली सगळी सिक्रेट लोकांना कळतील, कुणी आपल्याला नंतर छळलं सोशल मीडियात टाकलं तर काय करणार अशी भीती अनेकांना वाटते. म्हणून मग सेंटी होत म्हणतात की मनातलं बोलायलाच कुणी नाही. अनेकांना तर मित्रमैत्रिणींनी दगाफटका केल्याचा, आपल्याच गोष्टी गावभर केल्याचा अनुभव असतो. अशावेळी करायचं काय? कुणावर विश्वास ठेवायचा?

मैत्रीतले ब्रेक अप्स तर असतातच. एरवी म्हणायचे ये दोस्ती हम नही तोडेंगे पण  जरा काही कारणाने मैत्री तुटली, तर आजवरच्या बेस्ट फ्रेंडला एकदम व्हिलन करून टाकायचे, त्याविषयी सोशल मीडियात लिहायचे असे हल्ली सर्रास होते. आज मैत्रीत केलेले शेअरिंग उद्या मैत्री तुटली तर सेफ राहील का ही भीती असतेच. त्यामुळे मजा करायला मित्र, जगणं हॅपनिंग. पण सच्ची मैत्री नाही. 

(Image : google)

ऑफिसातले कलिग तर त्याहून वेगळे. ते मित्र असतात. एकत्र पार्ट्या होतात. बॉसविषयी बोललंही जातं काहीबाही. पण ते ऑफिसभर होऊन आपल्याला राजकारणात खेचलं जाणार नाही याची काहीच खात्री नसते. ऑफिसमधले सहकारी मित्र होऊ शकतात का यावर मग मंथन होते. पण दगाबाजीचा अनुभव अनेकांना येतोच.

आपल्याला काय करता येईल?

१. कुणी विश्वासाने आपल्याकडे त्याचे मन मोकळे केले, तर तो विश्वास ते नाते बरे राहो की वाईट, आपण जपू. आपण आपल्या मित्रांच्या आयुष्याची चावडी करायची नाही.
२. आपल्या मनातलं गावभर न सांगता एकदोन अगदी जवळच्याच मित्रमैत्रिणींना सांगायचे. सगळे जण सच्चे मित्र नसतात हे खरं पण विश्वास ठेवताना खात्री करायची.

(Image :google)

३. कुणी विश्वासघात केला म्हणून रडत बसायचं नाही. आणि अशी काही आपली बदनामी होत नाही. मुळात आपलं जग असं कितीसं मोठं असतं. होतात चुका म्हणून स्वत:ला आणि इतरांनाही माफ करुन टाकायचं.

Web Title: A breakup in a friendship torture for the whole life, if the friend cheated? What exactly are you missing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.