lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > तेलाची बरणी आतून तेलकट- चिकट झाली? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाटली होईल चकाचक 

तेलाची बरणी आतून तेलकट- चिकट झाली? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाटली होईल चकाचक 

Home Hacks For Cleaning Oil Bottles: बऱ्याच तेलाच्या बरण्यांचे तोंड निमुळते असते. त्यामुळे त्या आतमध्ये हात घालून घासता येत नाहीत. म्हणूनच हा सोपा उपाय... (how to clean oil container or bottles from inside)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2024 09:20 AM2024-05-04T09:20:58+5:302024-05-04T09:25:01+5:30

Home Hacks For Cleaning Oil Bottles: बऱ्याच तेलाच्या बरण्यांचे तोंड निमुळते असते. त्यामुळे त्या आतमध्ये हात घालून घासता येत नाहीत. म्हणूनच हा सोपा उपाय... (how to clean oil container or bottles from inside)

how to clean oil container or bottles from inside, home hacks for cleaning oil bottles, how to clean stickiness of oil bottles | तेलाची बरणी आतून तेलकट- चिकट झाली? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाटली होईल चकाचक 

तेलाची बरणी आतून तेलकट- चिकट झाली? १ सोपा उपाय- कमी मेहनतीत बाटली होईल चकाचक 

Highlightsबऱ्याच घरांमध्ये तेलाच्या बरणीचे तोंड अतिशय निमुळते असते. त्यामुळे तिच्यामध्ये हात घालून आपण ती घासणीने स्वच्छ करू शकत नाही.

तेलाच्या बरण्या ही आपल्या स्वयंपाक घरातली अशी एक वस्तू आहे जी खूप लवकर खराब होते, तिच्यावर डाग पडतात आणि काही दिवसांतच लगेच तेलकट होऊन जाते. बरणी बाहेरून तर आपण स्वच्छ करू शकतो. पण आतून ती कशी स्वच्छ करायची हा प्रश्नच असतो. कारण बऱ्याच घरांमध्ये तेलाच्या बरणीचे तोंड अतिशय निमुळते असते. त्यामुळे तिच्यामध्ये हात घालून आपण ती घासणीने स्वच्छ करू शकत नाही. अशा बरण्या घेणं खरंतर टाळावं. पण आता घेतल्या असतीलच तर त्या आतून कशा पद्धतीने स्वच्छ कराव्या (home hacks for cleaning oil bottles), याचा हा एक अतिशय सोपा उपाय पाहून घ्या.(how to clean oil container or bottles from inside)

तेलाची बरणी आतल्या बाजुने कशी स्वच्छ करायची?

 

तेलाची बरणी आतल्या बाजुने कशी स्वच्छ करायची, याचा एक सोपा उपाय priya_dwarke या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. 

डाएटिंग, जीम न करताही वजन होईल कमी, फक्त ५ कामं करा, काही आठवड्यातच फरक दिसेल

यामध्ये असं सांगितलं आहे की सुरुवातीला त्या बाटलीमध्ये एखादा चमचा तांदूळ, १ चमचा व्हिनेगर टाका.

त्यानंतर ती बाटली जवळपास अर्धी भरेपर्यंत त्यात पाणी ओता. आता ही बाटली खाली- वर अशा पद्धतीने हलवून घ्या. त्यानंतर साधारण ५ ते ७ मिनिटांनी तिच्यातले पाणी ओतून द्या.

 

यानंतर त्या बरणीमध्ये १ चमचा लिक्विड डिशवॉश आणि अर्धी बाटली भरेल एवढे पाणी टाका. पुन्हा एकदा बाटली वर- खाली अशा पद्धतीने हलवून तिच्यातले पाणी चांगले खळबळून घ्या. पाणी कोमट झाले की पाणी टाकून द्या. 

पित्ताशयात खडे झाल्यामुळे भारती सिंह रुग्णालयात, ५ चुकीच्या सवयींमुळेही होतो हा आजार- बघा लक्षणं

एक- दोन वेळा बाटली आतून स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्या. यानंतर बाटली पुन्हा बाहेरच्या बाजुने घासून  घ्या. बाटली आतून बाहेरून अगदी स्वच्छ- चकाचक झालेली असेल. 
 

 

Web Title: how to clean oil container or bottles from inside, home hacks for cleaning oil bottles, how to clean stickiness of oil bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.