lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > स्मार्ट-सुंदर-आकर्षक पर्सनॅलिटी हवी? करा फक्त ४ गोष्टी, होईल कायम कौतुक

स्मार्ट-सुंदर-आकर्षक पर्सनॅलिटी हवी? करा फक्त ४ गोष्टी, होईल कायम कौतुक

आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, हे आपल्यालाच माहिती नसेल तर काय उपयोग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 08:00 AM2024-01-02T08:00:00+5:302024-04-01T20:33:01+5:30

आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, हे आपल्यालाच माहिती नसेल तर काय उपयोग?

Want a smart-beautiful-attractive personality? Just do 4 things, be yourself always | स्मार्ट-सुंदर-आकर्षक पर्सनॅलिटी हवी? करा फक्त ४ गोष्टी, होईल कायम कौतुक

स्मार्ट-सुंदर-आकर्षक पर्सनॅलिटी हवी? करा फक्त ४ गोष्टी, होईल कायम कौतुक

Highlightsआपण आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे ओळखून त्याप्रमाणो स्वत:ला स्वीकारायला हवं. 

आपल्या अवतीभोवती, ऑफिसात एखादी स्मार्ट, टापटिप राहणारी, अतिशय नीट तयार होणारी कुणी असेल की अनेकींना तिची पर्सनॅलिटी आवडते. पण लगेच त्या स्वत:ची समजूत घालतात की तिला वेळ असेल. आपल्याला कुठं इतका वेळ आहे. आपण कसंबसं तयार होतो. पण स्मार्ट व्यक्तिमत्व आपली छाप पाडतं हे तर खरंच आहे. आणि स्मार्ट म्हणजे डिसेंट, भडक, अकारण लाऊड नाही. पण मग आपली अशी डिसेंट पर्सनॅलिटी हवी असेल तर काय करायला हवं?

‘पर्सनॅलिटी’ हा फार परवलीचा शब्द. अमूकची डॅशिंग आहे, तमूकची आकर्षक आहे, ढमूकची एकदम इम्प्रसिव्ह आणि आता तर सेक्सी हा शब्दही सर्रास वापरला जातो. आपली स्टाइल तशी असावी असं अनेकांना वाटतं. पण आपल्याला नेमकं काय आवडतं हेच माहिती नसतं त्यामुळे कॉपी करण्यात आणि त्यापायी पैसे खर्च करण्यातच जास्त वेळ जातो. आपण काय बोलतो, काय करतो, कुठल्या गोष्टींकडे आकर्षित होतो, या सर्व निर्णयांवर आपलं व्यक्तिमत्त्व आकार घ्यायला लागतं. काही गोष्टी जन्मत: मिळतात, मात्र व्यक्तिमत्व उत्तम घडवताही येऊ शकतं.  त्यामुळे निदान आपण आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे ओळखून त्याप्रमाणो स्वत:ला स्वीकारायला हवं. 

(Image :google)

आपण आपलं व्यक्तिमत्व स्मार्ट आणि ठाम कसं बनवू शकतो?

१. आपण कसे आहोत नेमके हा प्रश्न आपणच स्वत:ला विचारायला हवा. आपल्या मधले महत्त्वाचे गुण कोणते, याची यादी करा. तुम्ही शांत स्वभावाचे आहात की तापट, अबोल आहात की बडबडे, लोकांबरोबर पटकन मिसळता की ओळख व्हायला वेळ लागतो, विचारपूर्वक निर्णय घेता की जे सुचेल ते करुन मोकळे होता? हे असे प्रश्न स्वत:ला, आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना विचारा, स्वत:ला समजून घ्या.
२. हल्ली भरपूर ऑनलाइन पर्सनॅलिटी टेस्ट उपलब्ध आहेत, त्याही मोफत त्याही करुन पहायला हरकत नाही. त्यातून स्वत:विषयी काही अंदाज घेता येईल.

३. मुळात रंग, केस, कपडे म्हणजे आपण नाही. आपण जसे आहोत तसे युनिक आहोत हे मान्य करा.
४. स्वच्छ, टापटीप, साधे राहणे म्हणजे कमी स्मार्ट नाही. आपलं वर्तन आपल्याला स्मार्ट बनवतं, उथळपणा नाही.

Web Title: Want a smart-beautiful-attractive personality? Just do 4 things, be yourself always

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.