ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

Published:May 10, 2023 02:09 PM2023-05-10T14:09:41+5:302023-05-10T14:29:36+5:30

South Actress Sai Pallavi Birthday

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

साई पल्लवी ही साऊथची अतिशय लोकप्रिय अभिनेत्री. आपल्या साधेपणामुळे ती प्रेक्षकांना इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त जवळची वाटते. आज साई पल्लवीचा वाढदिवस. त्यानिमित्ताने पाहूया तिची खास झलक (South Actress Sai Pallavi Birthday).

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

साई पल्लवी सेंथामराय असून ९ मे १९९२ मध्ये तामिळनाडूमध्ये तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांचे नाव सेंथामराय कन्नन असून आईचे नाव राधा आहे. तिला पूजा नावाची एक लहान बहिणही आहे.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

निरागस चेहरा आणि सौंदर्याला उत्तम अभिनयाची असलेली जोड यामुळे साऊथचेच नाही तर जगभरातील चाहते साई पल्लवीवर फिदा असतात. तिचा साधेपणा हेही त्यामागचे आणखी एक कारण आहे.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

चित्रपटसृष्टीत येण्यासाठी विविध प्रकारच्या सर्जरी किंवा काही उपचार घेणाऱ्या अभिनेत्री आजुबाजूला असताना मेकअप न करता साई पल्लवीने आपली वेगळी ओळख निर्माण केली.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

तिच्यालेखी केवळ पैसा महत्त्वाचा नसून तिची तत्वही तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे २ कोटी रुपयांची फेअरनेस क्रिमची जाहिरात ती अतिशय सहजपणे नाकारु शकते.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

२०१५ मध्ये साई पल्लवीने प्रेमम या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्यावेळी ती एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. या यशाची हवा डोक्यात जाऊ न देता साईने आपले राहीलेले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने स्वत:ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट केले आहे. इतकंच नाही तर तिने आतापर्यंत दोन 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' जिंकले आहेत.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

अभिनयाबरोबरच साई पल्लवी ही तिच्या नृत्यकौशल्याबाबतही ओळखली जाते. नृत्यकला जोपासण्यासाठी आईने आपल्याला मदत केल्याचे साई आवर्जून सांगते.नृत्यकलेबाबत सांगितल्यावर तिच्या आईने साईला ऐश्वर्या रॉय आणि माधुरी दिक्षित यांचे व्हिडिओ दाखवले असे साईने एका मुलाखतीत सांगितले होते.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

बॉलिवूडमधूनही बऱ्याच ऑपर्स असताना साई पल्लवीने सध्या दक्षिण चित्रपटसृष्टीत फोकस करायचे ठरवले आहे. त्यामुळे मोठमोठ्या बॅनर्सकडून आलेल्या ऑफर्स तिने नाकारल्या आहेत.

ना मेकअप करते, ना गोऱ्या करणाऱ्या क्रिमच्या जाहिराती; डॉक्टर असलेली सुपरस्टार साई पल्लवी

अशा या सर्वांच्या लाडक्या आणि साधेपणाने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या साई पल्लवीला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा...