Lokmat Sakhi >Inspirational > 'किती सुटलीयेस...' वजनावरून लोकांनी हिणवलं अन् तिने ३० किलो घटवलं; जिमला न जाता हे कसं केलं पाहा

'किती सुटलीयेस...' वजनावरून लोकांनी हिणवलं अन् तिने ३० किलो घटवलं; जिमला न जाता हे कसं केलं पाहा

Weight Loss Transformation : जेव्हा वजन वाढलं तेव्हा मित्रमैत्रिणींपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनीच माझी थट्टा केली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:34 PM2024-04-03T15:34:12+5:302024-04-03T15:40:29+5:30

Weight Loss Transformation : जेव्हा वजन वाढलं तेव्हा मित्रमैत्रिणींपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनीच माझी थट्टा केली

Weight Loss Transformation : Weight Loss Transformation Story Of Jyoti Thorwe Fit To Fat Journey | 'किती सुटलीयेस...' वजनावरून लोकांनी हिणवलं अन् तिने ३० किलो घटवलं; जिमला न जाता हे कसं केलं पाहा

'किती सुटलीयेस...' वजनावरून लोकांनी हिणवलं अन् तिने ३० किलो घटवलं; जिमला न जाता हे कसं केलं पाहा

वजन कसं कमी करायचं हा (How to Loss Weight) सर्व महिलांच्या डोक्यात असणारा सर्वात कॉमन प्रश्न आहे. कारण आपण जास्त खाल्लं तेव्हाच वजन वाढतं असं नाही. महिलांच्या आयुष्यात असे वेगवेगळे टप्पे येत असतात ज्यावेळी अचानक शरीराचा आकार बदलत जातो आणि वजन वाढ होते. 'आधी बारीक होतीस आता किती सुटलीयेस, जरा वजन कमी कर, अगं किती जाड झालीस..' असं नेहमीच महिलांना ऐकावं लागतं. (Weight Loss Transformation Story Of Jyoti Thorwe Fit To Fat Journey) अशावेळी नैराश्य येत ते वेगळंच.

पण मनाशी ठरवलं तर अशक्य असे  काहीच नाही तुम्ही आपली पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलू शकता. त्यासाठी डाएट, व्यायाचामाचा आणि चांगल्या लाईफस्टाईलचा स्वीकार करावा लागतो. (Weight Loss Transformation) लग्नानंतर वजन वाढल्यानं मानसिक, शारीरिक त्रास आणि त्यातून स्वत:ला बदलण्याची इच्छा उमेद ठेवून सर्वांसाठी उत्तम उदाहरण ठरलेल्या एका महिलेची  कहाणी सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. 

मुलाला सांभाळता सांभाळता त्यांनी तब्बल ३० किलो वजन कमी केले आहे. मूळच्या महाराष्ट्रीयन असलेल्या ज्योती थोर्वे ( Weight Loss Transformation Story Of Jyoti Thorwe ) या आपल्या पतीसह यु के मध्ये २०२१ पासून राहत आहे.  सुरूवातीला त्यांचे वजन ९० किलो होते त्यांनी  वजन कमी करून  ६० वर आणले.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की,  ''२०१८ पासून माझं वजन वाढू लागतो. डिलिव्हरी झाल्यानंतर मी यु के ला गेले तेव्हा माझं वजन ९० किलो होते. जेव्हा वजन वाढलं तेव्हा मित्रमैत्रिणींपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनीच माझी थट्टा केली.  तेव्हाासून ठरवलं की आता वजन कमी करायचं आहे. त्यानंतर मी डाएटवर लक्ष द्यायला सुरूवात केली. माझं डाएट खूपच साधं होतं कारण मला ते जास्त वेळ कंटिन्यू करायचे होते. मी संध्याकाळी  ६ च्या आधीच खायचे आणि प्रत्येक जेवणानंतर थोडावेळ चालायला जायची.''


दिवसभरात काय काय खायच्या?

आपल्या आहाराबाबत त्या सांगतात की,''सकाळी उठल्यानंतर १ ग्लास गरम पाण्यात लिंबू आणि बारीक केलेलं आलं घालून प्यायचे. याव्यतिरिक्त ३ मिल्स असायचे ब्रेकफास्ट,लंच, डिनर यांचा यात समावेश होता. तिन्ही कॅलरीज मिळून १७०० कॅलरीजचे सेवन करायचे. मला चहा खूप आवडतो एक कप चहा आणि बिस्किट्स मी खायचे.  ब्रेकफास्टमध्ये बदाम आणि काजूचा शेक  घ्यायचे. दुपारच्या जेवणात २ चपाती किंवा १ भाकरी, २ कप डाळ, १ कप भाजी, १ ग्लास ताकाचा आहारात समावेश होता.

रात्रीच्या  जेवणात सॅलेड, सोया चाप इतर प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश असायचा. आठवड्यातून  १ दिवस चिट डे असायचा त्या दिवशी मी माझ्या आवडीच्या गोष्टी मनभरून खायचे. मी कधीच जीमला गेले नाही नेहमी घरीच व्यायाम केला. ट्रेड मीलवर ७ किलोमीटर वॉक करायचे. ज्यामुळे ७०० कॅलरीज बर्न  होण्यास मदत झाली.  घरात  ३० मिनिटं व्यायाम करताना  सिटअप्स, क्रंचेस, प्लँक्स, पुशअप्स या व्यायाम प्रकारांचा समावेश होता. व्यायामात  रोज ५ सेट्स आणि ३०  रिपेटेशन्स असायचे''

Web Title: Weight Loss Transformation : Weight Loss Transformation Story Of Jyoti Thorwe Fit To Fat Journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.