lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > खूप ओव्हरथिंक करता-टेंशन येतं? आनंदी राहण्यासाठी सुधा मूर्तींच्या खास टिप्स-जगणं होईल सोपं

खूप ओव्हरथिंक करता-टेंशन येतं? आनंदी राहण्यासाठी सुधा मूर्तींच्या खास टिप्स-जगणं होईल सोपं

Lessons By Sudha Murthy Make Life Easy And Successful : तुम्हाला नेहमी आनंदी, खूश राहण्याचा प्रयत्न करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 08:37 AM2024-05-01T08:37:00+5:302024-05-01T08:40:01+5:30

Lessons By Sudha Murthy Make Life Easy And Successful : तुम्हाला नेहमी आनंदी, खूश राहण्याचा प्रयत्न करा.

5 Life Lessons By Sudha Murthy Make Life Easy And Successful : | खूप ओव्हरथिंक करता-टेंशन येतं? आनंदी राहण्यासाठी सुधा मूर्तींच्या खास टिप्स-जगणं होईल सोपं

खूप ओव्हरथिंक करता-टेंशन येतं? आनंदी राहण्यासाठी सुधा मूर्तींच्या खास टिप्स-जगणं होईल सोपं

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) आपल्या मोटिव्हेशनल गोष्टींबाबत कायम चर्चेत असतात. सुधा मूर्ती आपले विचार नेहमीच लोकांबरोबर शेअर करत असतात. (Parenting Tips) प्रत्येक वयोगटातील मुलांना त्यांच्याकडून फार शिकायला मिळते. त्यांनी स्वत: लिहिलेल्या पुस्तकांमधून लोकांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. ज्या वाचल्यानंतर जीवन जगणं खूपच सोपं होऊ शकते.  रोजच्या जीवनात ५ गोष्टी फॉलो करून तुम्ही नेहमी आनंदी आणि यशस्वी राहू शकता. (Lessons By Sudha Murthy Make Life Easy And Successful)

सुधा मूर्तींचे लाईफ मंत्र कोणते आहेत (How To Be Happy Always)

१) सुधा मूर्ती सांगतात की तरूणांनी कोणत्याही परिस्थितीपासून पळ काढू नये. तुम्ही जन्मत:च कायम यशस्वी व्हाल असे नाही.  काही गोष्टींचा ताळमेळ राखत चालायला हवं. वेळेसोबत धावण्याची काही गरज नाही. नेहमी धैर्य ठेवून वागा.

दिवसभरात किती लिटर पाणी प्यावे? पाहा पाणी पिण्याची योग्य पद्धत-वजनही होईल कमी

२) कोणतीही व्यक्ती सुपर मॅन किंवा सुपर वूमन नसते. तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला स्विकार करा. जेणेकरून तुम्ही खूश आणि आनंदी राहाल.

३) आपला मेंदू नेहमी पॉझिटिव्ह राहील असे पाहा. समाजाप्रती सकारात्मक योगदान असेल असे पाहा. ज्यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल आणि कायम चांगले फिल कराल. 

४)  तुम्हाला नेहमी आनंदी, खूश राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यात  मानवता असेल तर तुम्ही एक चांगली व्यक्ती बनाल आणि आनंद राहाल. 

सकाळी लवकर डोळे उघडत नाही-खूप झोप येते? प्रेमानंद महाराज सांगतात १ युक्ती, आपोआप जाग येईल

५) विविधता आणि एकदा नेहमी सेलिब्रेट करा. हा आनंदी राहण्याचा एक चांगला उपाय आहे. कायम स्वत:वर विश्वास ठेवा. तुम्ही जे काही करत आहात ते योग्य आहे याची खात्री करा. सुधा मूर्ती सांगतात की प्रत्येकाने आपले गुण, चांगूलपणा, कमीपणा याचा स्विकार करायला हवा.

याचे उदाहरण देत त्या म्हणाल्या कोकिळा नाचू शकत नाही, मोर गाऊ शकत नाही. त्याप्रमाणे आपल्या सगळ्यात गोष्टी यायला हव्यात असं नाही. आपल्यातील कमतरता समजून घेऊन त्यानुसार स्वत:वर काम करा. कोणत्याही स्थितीत स्वतला स्विकारा. 

Web Title: 5 Life Lessons By Sudha Murthy Make Life Easy And Successful :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.