lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Mental Health > नवऱ्यासोबत असतानाही आमिर खानच्या लेकीला छळतोय एकटेपणा, इरा म्हणाली खूप भीती वाटते कारण.....

नवऱ्यासोबत असतानाही आमिर खानच्या लेकीला छळतोय एकटेपणा, इरा म्हणाली खूप भीती वाटते कारण.....

Aamir Khan's Daughter Ira Khan Is In Depression: अभिनेता आमिर खान याची लेक इरा खान तिच्या लग्नानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 12:02 PM2024-04-21T12:02:02+5:302024-04-21T12:03:28+5:30

Aamir Khan's Daughter Ira Khan Is In Depression: अभिनेता आमिर खान याची लेक इरा खान तिच्या लग्नानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Aamir khan's daughter ira khan is feeling very scared and lonely, read her instagram post | नवऱ्यासोबत असतानाही आमिर खानच्या लेकीला छळतोय एकटेपणा, इरा म्हणाली खूप भीती वाटते कारण.....

नवऱ्यासोबत असतानाही आमिर खानच्या लेकीला छळतोय एकटेपणा, इरा म्हणाली खूप भीती वाटते कारण.....

Highlightsलग्नापुर्वी काही वर्षे इरा खूप जास्त नैराश्यामध्ये होती. तिला असा मानसिक त्रास नेहमीच होतो. त्यामुळेच ती नुपूरशी लग्न करायला सुरुवातीला तयार नव्हती.

अभिनेता आमिर खान (Aamir khan) आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची लेक म्हणजे इरा खान (Ira Khan). इरा आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा विवाह नुकताच काही महिन्यांपुर्वी थाटामाटात पार पडला. विवाहानंतर ती नुपूरसोबत किती खुश आहे, किती आनंदी आहे हे सांगणाऱ्या काही पोस्ट ती आजवर सोशल मिडियावर शेअर करतच आली होती. पण आता मात्र तिने जी पोस्ट शेअर केली आहे, ती वाचून अनेकांना आश्चर्य वाटले आहे. लग्नानंतर तिचे सर्व काही व्यवस्थित चालू होते, मग आता अचानक तिला कशाची भीती वाटते आहे, नवरा सोबत असतानाही एकटेपणा का जाणवतो आहे अशा आशयाच्या अनेक कमेंट तिला येत आहे.(ira khan is feeling very scared and lonely)

 

इरा खान हिने इन्स्टाग्रामवर नुकतीच जी पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती म्हणते आहे की तिला सध्या खूप एकटं वाटत असून त्या एकटेपणाचीच भीती वाटू लागली आहे.

अर्धवट संपलेला आईस्क्रिमचा फॅमिली पॅक फ्रिजमध्ये ठेवताना ३ चुका टाळा, बघा आईस्क्रिम ठेवण्याची योग्य पद्धत

जगातल्या सगळ्या वाईट गोष्टींना ती घाबरत असून त्यात कुठेतरी आपण हरवून तर जाणार नाही ना, याला ती खूप घाबरते आहे. भीती हा प्रकार खूप वाईट असून माझ्याबाबतीत ती एक कधीही न संपणारी गोष्ट वाटते आहे. मला वाटणारी भती एवढी जास्त आहे की त्यामध्ये मी एक सक्षम व्यक्ती आहे, हे देखील मी विसरून जाते.

 

या पोस्टमध्ये इरा पुढे म्हणते आहे की मला माहिती आहे माझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती खूप सशक्त आहेत. मी कुठे हरवले तर ते मला नक्की शोधून काढतील, मी दुखावले गेले तर ते माझी काळजी घेतील.

शरीरात झालेले ४ बदल सांगतात डायबिटीसची लक्षणं- साधे वाटणारे हे धोकादायक बदल लगेच ओळखा

इराने शेअर केलेल्या या पोस्टवर तिचा नवरा नुपूरने I am here na अशी कमेंट केली आहे. लग्नापुर्वी काही वर्षे इरा खूप जास्त नैराश्यामध्ये होती. तिला असा मानसिक त्रास नेहमीच होतो. त्यामुळेच ती नुपूरशी लग्न करायला सुरुवातीला तयार नव्हती. पण नुपूरचे तिच्यावर एवढे प्रेम होते की त्याने तिच्या या त्रासासह तिला स्वीकारले. आताही तो तिला या त्रासातून बाहेर येण्यास नक्कीच मदत करेल, अशी अपेक्षा इराच्या मित्रमैत्रिणींना, नातलगांना असेलच...


 

Web Title: Aamir khan's daughter ira khan is feeling very scared and lonely, read her instagram post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.