lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fashion > महाराष्ट्र दिन विशेष : 'नथ' म्हणजे मराठी साजशृंगार, नथीचे हे '३' डिझाइन्स हवेच तुमच्याकडे, पाहा नथीचा नखरा

महाराष्ट्र दिन विशेष : 'नथ' म्हणजे मराठी साजशृंगार, नथीचे हे '३' डिझाइन्स हवेच तुमच्याकडे, पाहा नथीचा नखरा

3 Absolutely Stunning Marathi Nath Designs to Make Your Bridal Avatar Drop Dead Gorgeous : नथीचा नखरा प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलेने मिरवायलाच हवे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2024 11:31 AM2024-05-01T11:31:16+5:302024-05-01T11:36:07+5:30

3 Absolutely Stunning Marathi Nath Designs to Make Your Bridal Avatar Drop Dead Gorgeous : नथीचा नखरा प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलेने मिरवायलाच हवे..

3 Absolutely Stunning Marathi Nath Designs to Make Your Bridal Avatar Drop Dead Gorgeous | महाराष्ट्र दिन विशेष : 'नथ' म्हणजे मराठी साजशृंगार, नथीचे हे '३' डिझाइन्स हवेच तुमच्याकडे, पाहा नथीचा नखरा

महाराष्ट्र दिन विशेष : 'नथ' म्हणजे मराठी साजशृंगार, नथीचे हे '३' डिझाइन्स हवेच तुमच्याकडे, पाहा नथीचा नखरा

सणासुदीच्या काळात आपण पारंपारिक पेहराव घालतो (Nose Ring). महाराष्ट्रीयन मुली आवर्जून पारंपारिक पोशाख आणि दागिने परिधान करतात. नऊवारी साडीवर गळ्यातला हार, झुमके, बाजूबंद, नथ, बांगड्या शोभून दिसतात (Nath). मुख्य म्हणजे नथीमुळे चेहऱ्याला एक नवी चमक येते. महाराष्ट्रीयन नथींमध्ये अनेक प्रकार आहेत. पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ असे विविध प्रकार आढळतात (Fashion). बदलत्या काळानुसार, नथीमध्ये देखील विविध डिझाइन्स बाजारात आले आहेत.

नथ आपण महाराष्ट्रीयन असल्याचं दर्शवते. मध्यंतरी नथीचा नखरा हा ट्रेण्ड खूप चर्चेत आला होता. ज्यात महिलांनी विविध प्रकारच्या नथी घालून सेल्फी सोशल मीडियात शेअर केले होते. जर आपल्याला १ मे अर्थात महाराष्ट्रीयन दिनानिमित्त सुरेख दिसायचं असेल तर, नथीचे ट्रेण्डी डिझाइन्स पाहा, आणि आवर्जून खरेदी करा(3 Absolutely Stunning Marathi Nath Designs to Make Your Bridal Avatar Drop Dead Gorgeous).

कारवारी नथ

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील परंपरा कारवारी नथ दर्शवते. ही नथ प्रत्येक चेहऱ्याच्या आकारामध्ये शोभून दिसते. ही नथ थोडीफार बानू नथीप्रमाणेच दिसते. पण त्यामध्ये थोडीशी दाक्षिणात्य झलक असते. कारवार या शहरावरून या नथीला नाव देण्यात आलं असून, ही नथ सोनं, मोती, बसरा मोती यांनी तयार करण्यात येते.

विकतचा कशाला? घरीच अचूक प्रमाणात करा 'गरम मसाला'; चव अशी की विकतचे मसाले ठरतील फेल

ब्राह्मणी मोती नथ

पूर्वपरंपरागत चालत आलेली नथ म्हणजे ब्राह्मणी मोती नथ. प्रत्येक चेहऱ्यावर ही नथ शोभून दिसते. ही नथ साडी अथवा नऊवारी साडीवर शोभून दिसेल. या नथीमध्ये अनेक प्रकार आहेत. शिवाय यात विविध डिझाइन्स आहेत. या नथीची ओळख खड्यानेच होते. मुख्य म्हणजे ही नथ इतर नथींपेक्षा आकाराने थोडी मोठी असते.

केमिकलने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे? ६ ट्रिक्स, आंबे खा पोटभर-राहा निर्धास्त

पुणेरी नथ

लाल आणि हिरव्या खड्यांची नथ सध्या ट्रेण्डमध्ये आहे. ही नथ पुणेरी नथ म्हणूनही ओळखली जाते. या नथीमध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या दोन्ही मोत्यांचा वापर केला जातो. तसंच याचा आकार थोडा मोठा असून, याची तार सरळ रेषेत असते. आपला चेहरा थोडा चौकोनी अथवा लांबसर असेल तर, ही नथ चेहऱ्यावर शोभून दिसेल.

Web Title: 3 Absolutely Stunning Marathi Nath Designs to Make Your Bridal Avatar Drop Dead Gorgeous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.