lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Celebrity Corner > आता तुझ्यात चार्म उरला नाही! नावं ठेवणाऱ्या चाहत्याला समंथा प्रभू म्हणाली, तुमच्यावर अशी वेळ कधीही..

आता तुझ्यात चार्म उरला नाही! नावं ठेवणाऱ्या चाहत्याला समंथा प्रभू म्हणाली, तुमच्यावर अशी वेळ कधीही..

Samantha Ruth Prabhu Reply To Trollers : ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉँच दरम्यान चाहत्यांनी केली कमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 06:00 PM2023-01-11T18:00:43+5:302023-01-11T18:27:52+5:30

Samantha Ruth Prabhu Reply To Trollers : ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉँच दरम्यान चाहत्यांनी केली कमेंट

Samantha Ruth Prabhu Reply To Trollers : Samantha Ruth Prabhu Reply To Trollers : Samantha Prabhu's gut-wrenching reply to fans who say "Your charm, glow is gone", says… | आता तुझ्यात चार्म उरला नाही! नावं ठेवणाऱ्या चाहत्याला समंथा प्रभू म्हणाली, तुमच्यावर अशी वेळ कधीही..

आता तुझ्यात चार्म उरला नाही! नावं ठेवणाऱ्या चाहत्याला समंथा प्रभू म्हणाली, तुमच्यावर अशी वेळ कधीही..

Highlightsसोशल मीडियावर समंथाला ट्रोल करण्यात आले आहे...विनाकारण तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो गेला असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. दक्षिणेकडील रसिकांबरोबरच जगभरात तिचे चाहते पाहायला मिळतात. नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटामुळे समंथा बरीच चर्चेत होती. या दोघांचे नाते तुटल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. तर त्यानंतर समंथा सावरली असून तिने आपल्या पुढच्या कामांनाही सुरुवात केल्याचे दिसले (Samantha Ruth Prabhu Reply To Trollers). 

मात्र काही दिवसांपूर्वीच समंथाच्या आयुष्य़ात पुन्हा एक अडचण निर्माण झाली. ती म्हणजे  समंथाला त्वचेशी निगडीत एका समस्येचा सामना करावा लागत आहे. समंथा रुथ प्रभू त्वचेशी संबंधित आजाराशी झुंज देत आहे. या आजाराला 'पॉलीमॉर्फ्स लाइट एरप्शन' म्हणतात. हा फारसा गंभीर आजार नाही. सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे किंवा काही वेळा डाग पडणे अशा समस्या निर्माण होतात.

(Image : Google)
(Image : Google)

समंथा सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह असून आपल्या चाहत्यांना ती तिच्या आयुष्यातील अपडेटस देत असतात. तिचे सोशल मीडियावर खूप जास्त फॉलोअर्स असून तिच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटसही मिळतात. त्वचेच्या समस्येने त्रस्त असलेली समंथा गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहत नव्हती. मात्र ‘शाकुंतलम’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉँच दरम्यान समंथा उपस्थित राहीली. यावेळी तिने छान पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसली. तिला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. या ट्रेलरच्या रिलीजसाठी उपस्थित असणाऱ्या समंथाला चाहत्यांनी विनाकारण ट्रोल केले. 

ट्विटरवर बझ बास्केट या अकाऊंटवर समंथाला ट्रोल करण्यात आले. “समंथासाठी फार वाईट वाटते, कारण तिच्या चेहऱ्यावरचा चार्म आणि ग्लो हरवला आहे.” असे या पोस्टमध्ये म्हटले होते. तर घटस्फोटापासून दूर आली आणि प्रोफेशनल लाईफ अतिशय चांगले चालले आहे असे म्हणत असतानाच मायोसिस आजाराने तिला ग्रासले आणि त्यामुळे ती विक झाली असेही या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. ही पोस्ट रिशेअर करत समंथा म्हणत, माझ्याप्रमाणे काही महिन्यांची ट्रिटमेंट आणि औषधोपचार कोणालाच घ्यावे लागू नयेत अशी मी प्रार्थना करते. आणि तुमचा ग्लो वाढावा यासाठी माझ्याकडून थोडे प्रेम असेही ती उपहासाने कॅप्शनमध्ये लिहीते.  

 

Web Title: Samantha Ruth Prabhu Reply To Trollers : Samantha Ruth Prabhu Reply To Trollers : Samantha Prabhu's gut-wrenching reply to fans who say "Your charm, glow is gone", says…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.