lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > भर उन्हाळ्यातही फुलांनी भरगच्च बहरून जातील रोपं, बघा 'या' जादुई पाण्याची कमाल-फुलं वेचून दमाल

भर उन्हाळ्यातही फुलांनी भरगच्च बहरून जातील रोपं, बघा 'या' जादुई पाण्याची कमाल-फुलं वेचून दमाल

Gardening Tips For Getting More Flower: उन्हाळ्यातही तुमची बाग टवटवीत, सुगंधी फुलांनी सजवून टाकायची असेल तर रोपांना एक खास पाणी द्या... रोपांना येतील फुलंच फुलं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 11:11 AM2024-05-02T11:11:28+5:302024-05-02T14:43:47+5:30

Gardening Tips For Getting More Flower: उन्हाळ्यातही तुमची बाग टवटवीत, सुगंधी फुलांनी सजवून टाकायची असेल तर रोपांना एक खास पाणी द्या... रोपांना येतील फुलंच फुलं....

How to make flowers bloom quickly? homemade fertilizers for getting more flowers | भर उन्हाळ्यातही फुलांनी भरगच्च बहरून जातील रोपं, बघा 'या' जादुई पाण्याची कमाल-फुलं वेचून दमाल

भर उन्हाळ्यातही फुलांनी भरगच्च बहरून जातील रोपं, बघा 'या' जादुई पाण्याची कमाल-फुलं वेचून दमाल

Highlightsयामुळे रोपांची वाढ तर छान होईलच पण त्यांना खूप भरभरून फुलं येतील.

उन्हाचा कडाका सध्या चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अगदी पंख्याखाली, एसीमध्ये बसूनही आपल्याला डिहायड्रेशनचा, उष्णतेचा जो व्हायचा तो त्रास होतोच. असंच काहीसं बागेतल्या नाजूक रोपांचंही होतं. उन्हाचा चढलेला पारा त्यांना सहन होत नाही. त्यामुळे ते कोमेजून जातात. त्यामुळे या दिवसांत बागेतल्या रोपांची विशेष काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा तर असं होतं की रोपंच कोमेजून गेल्याने त्यांना धड फुलंही येत नाहीत (How to make flowers bloom quickly?). तुमच्या बागेतल्या रोपांचंही असंच झालं असेल तर लगेचच हा एक उपाय करून पाहा. यामुळे रोपांची वाढ तर छान होईलच पण त्यांना खूप भरभरून फुलं येतील. (homemade fertilizers for getting more flowers)

 

बागेतल्या रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

बागेतल्या रोपांना भरपूर फुलं येण्यासाठी काय उपाय करावा, याची माहिती home_gardening86 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये जो उपाय करायला सांगितला तो करण्यासाठी आपल्याला काही घरगुती पदार्थच वापरायचे आहेत. 

उन्हामुळे त्वचा काळवंडणार तर नाहीच, उलट आणखी चमकून उठेल- केशर वापरून करा 'हा' उपाय

हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी १ मध्यम आकाराचा बटाटा घ्या आणि त्याचे लहान लहान तुकडे करा. हे तुकडे साधारण मुठभर तरी असावेत.

 

यानंतर बटाट्याचे काप एका भांड्यात टाका. त्यामध्ये एका केळीचं साल, अर्धा टेबलस्पून व्हिनेगर, १ चमचा यीस्ट टाका.

माधुरी दीक्षित केसांना महागडं, ब्रॅण्डेड नाही, तर 'हे' साधं घरगुती तेल लावते, बघा व्हायरल व्हिडिओ

यानंतर या सगळ्या मिश्रणामध्ये साधारण अर्धा लीटर पाणी टाका आणि सगळं मिश्रण हलवून झाकून ठेवून द्या. 

साधारण ७ ते ८ तासांनी हे मिश्रण थोडं- थोडं करून सगळ्या फुलझाडांना टाका. हा उपाय आठवड्यातून एकदा करा. तुमच्या बागेतल्या रोपांना नेहमीच टवटवीत फुलं येतील. फुलांमध्ये कधीच खंड पडणार नाही. 


 

Web Title: How to make flowers bloom quickly? homemade fertilizers for getting more flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.