शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा; अमोल कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 06:23 PM2024-05-03T18:23:52+5:302024-05-03T18:26:10+5:30

मी बोलतो तर पुराव्यानिशीच बोलतो, असं म्हणत हा फक्त ट्रेलर आहे, शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा, असे आव्हानही विरोधकांना दिले....

Be prepared to withdraw if you are true to your word; Amol Kolhe's challenge to Udahrao | शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा; अमोल कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा; अमोल कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

शिरूर (पुणे) : माजी खासदार केवळ आपला व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत त्यांनी आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी ७० पेक्षा अधिक प्रश्न सरंक्षण खात्याविषयी विचारले असल्याचा आरोप खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. मी बोलतो तर पुराव्यानिशीच बोलतो, असं म्हणत हा फक्त ट्रेलर आहे, शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्यायची तयारी करा, असे आव्हानही विरोधकांना दिले.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, ज्यांनी १५ वर्षे ज्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले ते जेव्हा सांगतात की, मी हजार ते अकराशे प्रश्न विचारले. त्यातले ६० ते ७० प्रश्न असे आहेत, की ज्या संरक्षण खात्याला, रेल्वेला त्यांची कंपनी काहीना काही गोष्टी सप्लाय करते.

हे प्रश्न असे आहेत की, संरक्षण खात्यात, रेल्वेत ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या केव्हा खरेदी केल्या जाणार कोणाकडून खरेदी केल्या जाणार. या खरेदीचा नेमका टप्पा काय आहे, असे प्रश्न जर लोकसभेचा सदस्य विचारत असेल तर असे प्रश्न विचारून परदेशातील स्वतःच्या कंपनीच उखळ पांढरं करून घेणारा लोकप्रतिनिधी असेल तर त्याला लोकप्रतिनिधी म्हणायचं की, लोकप्रतिनिधीच्या वेशातला व्यापारी म्हणायचं, हे विचारणं गरजेचं आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, त्यांनी आता आव्हान दिलं आहे, शब्दाला माणूस पक्का असेल तर माघारी घेण्याची तयारी करावी. गेली पाच वर्षे मी संसदेत बोलताना, पुराव्यानिशी कधी बोललो नाही. मी कधीच कोणाच्या व्यवसायावर बोलत नाही; पण सातत्याने जेव्हा नटसम्राट, नौटंकी यासह खालच्या पातळीवरची भाषा केली जाते, तेव्हा मला प्रश्न पडत होता. मतदारसंघात दाखवायचं मी तुमच्यासाठी काम करतोय, आणि दिल्लीत जाऊन स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करायचं हा अनुभव घेतला, असं म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. कोल्हे हे गुरुवारी सातारा दौरा करून शुक्रवारी पुन्हा आपल्या मतदारसंघात गावभेट करीत कोपरासभा घेत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, स्वप्नील गायकवाड, पोपट शेलार, विद्या भुजबळ, विश्वास ढमढेरे, संभाजी फराटे, दत्तात्रय फराटे, शंकर फराटे, सुभाष कळसकर, संजय देशमुख, जीवन तांबे, शरद निंबाळकर, राहुल करपे, गोरक्ष गदाडे, मच्छिंद्र गदादे यांसह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Be prepared to withdraw if you are true to your word; Amol Kolhe's challenge to Udahrao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.